Shravan Special Recipe : बरेच लोक श्रावणी सोमवारचा उपवास करतात. भोलेथांना प्रसन्न करण्यासाठी भक्त पूजेसोबतच विविध पदार्थांचा नैवेद्य भोलेनाथांना दाखवतात. आज आपण भोलेनाथांना खुश करण्यासाठी घरच्या घरी टेस्टी प्रसादाची रेसिपी जाणून घेऊया. ही रेसिपी चवीला टेस्टी असून तुम्ही खालील स्टेप्स फॉलो केल्यास अगदी चविष्ट असा पदार्थ तुम्हाला खायला मिळेल. चला तर मग बाजारासारखा टेस्टी मालपुआ कसा बनवायचा पाहुयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालपुआ साहित्य

  • २ कप गव्हाचे पीठ
  • वेलदोड्याचा थोडा कुट
  • किसलेले खोबरे
  • २५० ग्रॅम साखर
  • अर्धी लीटर दूध

मालपुआ कृती

  • मालपुआ बनवण्यासाठी सगळ्यात आधी दूधात साखर टाकून जवळपास अर्धा तास गॅसवर ठेवा.
  • नंतर गव्हाच्या पिठात नारळाचा किस आणि वेलदोड्याचा कुट टाकून चांगल्याप्रकारे मिसळून घ्या.
  • आता यात दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
  • आता एका कढईत तूप गरम करा आत एक मोठा चमचा तूप या घट्ट पेस्टमध्ये घाला.

हेही वाचा – शिल्लक चपात्यांपासून १० मिनिटांत करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट – टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन

  • आता पुआ दोन्ही बाजूंनी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्या. तुमचा टेस्टी मालपुआ खाण्यासाठी तयार आहे.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan special recipe easy malpua recipe in marathi simple malpua recipe in marathi malpua recipe srk
Show comments