Pakatali Puri: श्रावण महिन्यात विविध गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. आतापर्यंत आपण साटोऱ्या, पुरणाची करंजी अशा विविध रेसिपी बनवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला पाकातल्या पुऱ्या कशा बनवायच्या हे सांगणार आहोत. चला तर मग लिहून घ्या साहित्य आणि कृती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४ वाट्या मैदा
  • २ वाटी रवा
  • १ वाटी तेल
  • २ वाटी आंबट ताक
  • ३ वाट्या साखर
  • २ लिंबाचा रस
  • केशराच्या काड्या
  • तळण्यासाठी तूप
  • चवीनुसार मीठ

पाकातल्या पुऱ्या बनवण्याची कृती:

हेही वाचा: श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा ‘रताळ्याची पौष्टिक खीर’; नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम मैदा आणि रवा एकत्र करुन घ्या.
  • त्यानंतर त्यात कडकडीत तेलाचे मोहन आणि चवीनुसार मीठ घालून ताकामध्ये भिजवावे.
  • नंतर साखरेचा एक तारी पाक करुन त्यात केशर आणि लिंबाचा रस घालून घ्यावा.
  • मैदा आणि रव्याच्या भिजवलेल्या पीठाच्या पुऱ्या तयार करुन त्या तुपात तळून लगेच गरम पाकात टाकाव्यात.
  • तयार गरमागरम पाकातल्या पुऱ्यांवर केशर घालून खाण्यासाठी सर्व्ह कराव्या.