श्रावणातील मंगळागौरीचा सण म्हणजे स्त्रियांसाठी पर्वणीच असते. मंगळागौरी साजरी करताना सगळ्या स्त्रिया अगदी नटून – थटून, भरजरी साड्या, दागिने घालून तयार असतात. हा सण म्हणजे खेळ, पूजा, नाच, गाणी, उखाणे, खाण्याची मेजवानी असा झक्कास बेत असतो. सकाळी मंगळागौर आणि महादेवाच्या पिंडीची पूजा आणि रात्री जागरण करून मंगळागौरीचे खेळ असा या दिवसाचा कार्यक्रम असतो. दिवसभर मंगळागौरीचे खेळ खेळून, नाच गाणी करून भूक लागली की मग या खास दिवशी बनवा भाजणीचे वडे . चला याची रेसिपी जाणून घ्या.
श्रावण मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे साहित्य
२ वाट्या वडे भाजणी पीठ
हिरवी मिरची अद्रक पेस्ट
१ टेबलस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून धना जिरा पावडर
१ टेबलस्पून ओवा
१ टेबलस्पून तीळ
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
आवश्यकतेनुसार पाणी
श्रावण मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे कृती
१. प्रथम वड्याची भाजणीचे पीठ घ्यावे त्यात एक चमचा तीळ व ओवा घालून घ्यावे.
२. नंतर या पीठात तिखट, मीठ, हळद, सर्व मसाले टाकून घेणे. हिरव्या मिरचीचा ठेचा भरपूर कोथिंबीर घालून घेणे सर्व मिक्स करून घेणे.
३. नंतर त्यात दोन चमचे मोहन टाकून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्यावा. गोळा जास्त घट्ट पण नको जास्त सैल पण नको असा करावा दहा मिनिटे झाकून ठेवावा.
४. दहा मिनिटांनी हा गोळा परत हाताने मळून घ्यावा. नंतर याचा एक छोटा गोळा घेऊन हाताला पाणी लावून प्लास्टिकच्या पिशवीवर वडा थापून घ्यावा.
५. गॅसवर कढईत तेल तापायला ठेवावे तेल तापल्यानंतर मिडीयम गॅसवर वडे तळून घ्यावे.
हेही वाचा >> Shravan Recipe : श्रावणी सोमवारी महादेवाला अर्पण करा “पनीर जिलेबी”चा प्रसाद; जाणून घ्या सोपी मराठी रेसिपी
६. अशाप्रकारे सर्व वडे खमंग तळून घ्यावे.
७. छान खमंग खुसखुशीत वडे तयार. दह्यासोबत किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.
© IE Online Media Services (P) Ltd