भाज्यांमध्ये सर्वात नावडती भाजी कोणती असा प्रश्न विचारला तर हमखास ‘कारलं’ हे उत्तर मिळते. मात्र तुम्हाला माहित आहे का, कारले खाल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदे होतात. उदाहरण द्यायचे झाले तर कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते; तसेच डोळ्यांसाठी ही भाजी फायदेशीर आहे असे म्हटले जाते. हे फायदे वाचून जरी कारले खावेसे वाटले, तरी त्याच्या कडू चवीच्या विचारानेच अंगावर शहारा येतो, नाही का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने शेअर केलेल्या या चटपटीत रेसिपीचा वापर करून तुम्ही कारलेदेखील अगदी आवडीने खाऊ शकता. इतर भाज्यांची बनवतो, तशी कारल्याची भाजी न बनवता त्याच्या मस्त खमंग आणि खरपूस अशा काचऱ्या करून पाहा. काय आहे या काचऱ्यांची साधी सरळ रेसिपी बघा.

हेही वाचा : कडू कारले आरोग्यासाठी खूपच उपयुक्त; जाणून घ्या एकापेक्षा एक गुणकारी फायदे

कारल्याच्या कुरकुरीत काचऱ्या :

साहित्य

कारली
मीठ
हळद
गरम मसाला
धणे पावडर
जिरे पूड
लाल तिखट
लिंबाचा रस
बेसन
मक्याचे पीठ
तेल

हेही वाचा : Recipe : शेवग्याच्या शेंगांपासून बनवा पौष्टिक ‘शेकटवणी’; पाहा या आंबट-गोड पदार्थाचे प्रमाण अन् रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून घ्या.
  • आता कारल्याचे डेख चिरून घ्या आणि चमच्याच्या किंवा सुरीच्या मदतीने कारल्यातील सर्व बिया/गर काढून घ्या.
  • नंतर कारल्याच्या गोल चकत्या चिरून घ्या.
  • एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालून, त्या पाण्यात कारल्याच्या चकत्या घालून ठेवा.
  • काही मिनिटे या चकत्या मिठाच्या पाण्यात तशाच राहू द्या. यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते.
  • आता पाण्यातील कारल्याच्या चकत्या दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
  • त्यामध्ये हळद, लाल तिखट, धणे पूड, गरम मसाला, जिरे पावडर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून घ्या.
  • तसेच बेसन आणि मक्याचे पीठ घालून कारल्याच्या चकत्या या पदार्थांमध्ये व्यवस्थित घोळवून घ्या. एकजीव करून घ्या.
  • चकत्यांना पीठ आणि मसाले नीट, एकसमान लागले असल्याची खात्री करा.
  • गॅसवर एक पसरट तवा किंवा पॅन गरम करून घ्या.
  • त्यामध्ये थोडेसे तेल घालावे.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये मसाले आणि पिठात घोळवलेल्या कारल्याच्या चकत्यांना सोडा.
  • तेलामध्ये या चकत्या खमंग खरपूर परतून घ्या.
  • आपल्याला कारले तळायचे नसल्याने तेलाचा वापर प्रमाणात करावा.
  • चकत्या दोन्ही बाजूंनी खमंग परतल्यांनंतर त्यांना बाऊलमध्ये काढून घ्यावे.
  • कारल्याच्या कुरकुरीत आणि चवीला चटपटीत असणाऱ्या या काचऱ्या गरमागरम खायला घ्या.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @me_haay_foodie नावाच्या अकाउंटने या सोप्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ४.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simple food recipe how to make crunchy karela fry follow this simple steps to make delicious bitter gourd dha