Simple Recipe for janmashtami: सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद, देवीला नैवेद्य किंवा मग श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी विशेष अशी आज रेसिपी करुयात. हा पदार्थ अगदी झटपट तयार होतो. शिवाय त्यासाठी खूप काही विशेष मेहनतही घ्यावी लागत नाही. या पदार्थाचा आणखी एक फायदा म्हणजे एखाद्या पदार्थाचं प्रमाण कमी- जास्त होऊन बिघडेल, असं यात मुळीच नसतं. त्यामुळे अगदी पहिल्यांदा ट्राय करणार असाल, तरीही हा पदार्थ उत्तमच जमेल. चला तर मग पाहुयात प्रसादासाठी अळीवाचे लाडू कसे करायचे.
अळीवाचे लाडू साहित्य
- १ वाटी अळीव
- २ नारळ
- अर्धा किलो गूळ
- १० बदाम बारीक़ चिरलेले
- किंवा जाडसर पूड करून
- काजू आवडीनुसार बारीक
- किंवा जाडसर पूड करून
- २ मोठे चमचे मनुके
- १/२ छोटा चमचा वेलची पूड
अळीवाचे लाडू कृती
- नारळाच्या पाण्यात किंवा १ वाटी दुधात अळीव २ तास भिजत ठेवणे.
- अळीव भिजल्यावर अळीव, ओले खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर शिजायला ठेवावे. नीट मिसळले की काजू पूड, बदाम पूड व वेलची पावडर घालून ढवळावे.
- पाण्याचा अंश आटून खुटखुटीत होईपर्यंत शिजवावे.
- गोळा झाला की मिश्रण गॅस बंद करावा. मिश्रण थंड होऊ दयावे.
हेही वाचा >> Janmashtami 2023 : श्रीकृष्णाला नैवेद्यासाठी पंचामृत कसं बनवायचं? जाणून घ्या पारंपारिक रेसिपी
- थंड झाल्यावर हव्या त्या आकारात लाडू वळावेत.