How to make tandoori gobi tikka recipe: तंदूरी पनीर, कोबी, बटाटा किंवा चिकन टिक्का, पदार्थ कोणताही असो तंदूरमध्ये शिजवलेल्या पदार्थांची चव खूपच जबरदस्त असते. पण तुम्ही कधी तंदूरी गोबी टिक्का खाल्लाय का नाही ना. शाकाहारी लोकांसाठी ही अगदी परेफेक्ट डीश आहे. चला तर मग तंदूर फ्लॉवर टिक्का कसा बनवायची याची रेसिपी जाणून घेऊयात.

तंदूर फ्लॉवर टिक्का साहित्य

Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
How To Make Kobi paratha
Kobi Paratha : पौष्टीक आणि स्वादिष्ट! कोबीचा बनवा पराठा, न आवडणारे देखील आवडीने खातील
methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO
masala chaap recipe
रेस्टॉरंट स्टाईल ‘मसाला चाप’ आता घरच्या घरीच बनवा, सोपी रेसिपी लगेच लिहून घ्या

फ्लॉवर – १

घट्ट दही – १ कप

बेसन – ३ चमचे

लाल तिखट – १/२ टीस्पून

गरम मसाला – १ टीस्पून

चाट मसाला – १ टीस्पून

हळद – १/२ टीस्पून

धने पावडर – १ चमचा

ओवा – १/२ चमचा

कसूरी मेथी – १ चमचा

तेल – आवश्यकतेनुसार

मीठ – चवीनुसार

तंदूर फ्लॉवर टिक्का कृती

१. तंदूर फ्लॉवर टिक्का बनवण्यासाठी सर्वप्रथम फ्लॉवरच्या कळ्या चिरून घ्या. हे नीट धुवून चार ते पाच मिनिटे वाफवून घ्या. फ्लॉवर वाफवल्याने त्यात सर्व मसाल्यांचा चांगला कोट होतो.

२. आता वाफवलेले फ्लॉवर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या. या बाऊलमध्ये तेल वगळता सर्व साहित्य घाला आणि हलक्या हातांनी मिक्स करा.

३. आता हा बाऊल झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. कढईत आवश्यकतेनुसार तेल गरम करून त्यात कोबीचे तुकडे घाला. मध्यम आचेवर काही मिनिटे शिजवा. तळलेली कोबी एका बाऊलमध्ये काढून घ्या.

४. कोळशाचा एक छोटा तुकडा गरम करा. कोळसा लाल झाल्यावर स्टीलच्या वाटीत ठेवा. ही वाटी तंदूरी कोबी असलेल्या बाऊलच्या मध्यभागी ठेवा.

हेही वाचा >> भोपळ्याची आंबट-गोड भाजी; एकदा खाल तर खातच रहाल अशी सोपी रेसिपी

५. बाऊलमध्ये एक चमचा तूप घाला आणि बाऊल एक मिनिट झाकून ठेवा. असे केल्याने गोबी टिक्कामध्ये कोळशाचा सुगंध येईल. तुमची तंदूरी गोबी टिक्का तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Story img Loader