Sodyachi khichdi recipe in marathi: काहींना रोजचं साधं जेवण खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा काही तरी वेगळं तसेच व्हेज-नॉनव्हेज खाण्याची तल्लफ येते. त्यावेळी कुणी मटण, कुणी चिकन, कुणी बिर्याणी तर कुणी फिश खाण्याला पसंती देतात. त्यात अनेकांना फिश आवडतंच असेल.नॉनव्हेज खाणारी माणसं चिकन, मटण तर कधी मच्छीवर ताव मारतात. सुखी मच्छी तर अनेकांना आवडते, चला तर मग सोड्याची खिचडी कशी करायची जाणून घेऊयात.
सोड्याची खिचडी साहित्य
१. १ वाटी सोडे
२. २ मध्यम आकाराचे कांदे चिरून
३. १ वाटी वाटणे
४. २ टोमॅटो उभे बारीक चिरून
५. १/४ वाटी कोथिंबीर बारीक चिरून
६. १०-१२ लसूण पाकळ्या ठेचून
७. २ टीस्पून खीसलेले आले
८. १ तमालपत्र
९. ५-६ लवंगा
१०. ५-६ मिरी
११. १ इंच दालचिनी
१२. १ टीस्पून हळद
१३. २ टीस्पून लाल तिखट
१४. १ टीस्पून गरम मसाला
१५. चवीनुसार मीठ
१६. दीड वाटी तांदूळ
१७. २ टेबलस्पून तूप
सोड्याची खिचडी कृती
१. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला घालावा. त्यात ठेचलेला लसूण आणि कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावा.
२. परतलेल्या कांद्यावर टोमॅटो आणि वाटणे घालून चांगले परतावे आणि ५ मिनिट वाफ काढून घ्यावी. त्यावर सोडे घालून पुन्हा एकदा नीट परतून घ्यावे. आता त्यावर धुतलेले तांदूळ घालून एकजीव करून घ्यावे.
हेही वाचा >> रविवार स्पेशल आगरी कोळी पद्धतीने कुरकुरीत आणि चमचमीत “हलवा फ्राय” ही घ्या सोपी रेसिपी
३. भाताच्या दुप्पट पाणी घालून शिजण्यासाठी ठेवून द्यावे. गरज वाटल्यास आणखी पाणी घालू शकता. साधारणतः २० मिनिटांनी खिचडी खाण्यासाठी तयार होते. ही गरमागरम खिचडी सर्व्ह करावी.