‘वांगी’ हा भाजीचा असा प्रकार आहे की अनेकजण आवडत नाही म्हणून नाकं मुरडतात. वांग्याची भाजी ताटात वाढलेली बघून आपल्याला जेवण नकोसे वाटते. वांग्यातील त्या लहान – लहान बिया असो किंवा अगदीच मऊ लगदा झालेल्या वांग्याचा फोडी असो, यांसारख्या अनेक कारणांनी आपल्याला वांगे खाणे आवडत नाही.म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विदर्भ रेसिपी सोले वांगे रेसिपी. या पद्धतीनं वागं बनवाल तर नावडतीची भाजीही होईल आवडीची…
सोले वांगे साहित्य
- ४ मध्यम आकाराचे वांगे
- १/२ कप ओले तुरीचे दाणे
- १ कांदा
- १ टोमॅटो
- २ टेबलस्पून कांदा टोमॅटो पेस्ट
- २ टेबलस्पून तेल
- १ टीस्पून जीरे मोहरी
- १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
- १ टीस्पून हळद
- १.५ टीस्पून तिखट
- १ टीस्पून धणे पूड
- १ टीस्पून पाव भाजी मसाला
- चवीनुसार मीठ
- १ छोटा गुळाचा खडा
- कोथिंबीर
सोले वांगे कृती
स्टेप १
वांगी स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि चिरून घ्यावे. चिरलेले कांदे पाण्यात ठेवावे म्हणजे ते काळे पडत नाहीत. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा आणि दोन चमचे कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी. तुरीचे दाणे धुऊन घ्यावेत.
स्टेप २
आता गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर, त्यात जीरे मोहरी टाकावी. ते तडतडल्यावर त्यात कांदा टाकावा. कांदा किंचित परतून घेतल्यावर त्यात आले लसूण पेस्ट आणि कांदा टोमॅटोची पेस्ट टाकावी.
स्टेप ३
हे सर्व एकत्र करून मिनिटभर परतून घ्यावे. आता त्यात टोमॅटो टाकावे आणि पुन्हा एकदा दोन मिनिट परतून घ्यावे. आता त्यात हळद, तिखट, धणेपूड टाकावी आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
स्टेप ४
नंतर त्यात तुरीचे दाणे टाकावे. मिक्स करून त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजू द्यावे. आता त्यात पावभाजी मसाला टाकावा.
स्टेप ५
पुन्हा एकदा चांगले एकत्र केल्यानंतर त्यात, चिरलेली वांगी टाकावी. मिक्स करून त्यात आपल्या गरजेनुसार पाणी टाका वे.
स्टेप ६
नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यावे.
स्टेप ७
गुळाचा एक छोटा खडा टाकावा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शिजवावे.
स्टेप ८
शिजवताना मध्ये वांगे शिजल्याची खात्री करून घ्यावी
स्टेप ९
वांगी शिजल्यावर आणि रस्सा किंचित घट्ट आल्यावर गॅस बंद करावा.आणि त्यात चिरलेली कोथिंबीर टाकावी.
हेही वाचा >> विदर्भाची खासियत म्हणजे चमचमीत तर्रीदार “डाळ कांदा”; वाचा सोपी रेसिपी
स्टेप १०
अशाप्रकारे हिवाळा मधील विदर्भ स्पेशल सोले वांगे तयार आहेत. आता हे गरमागरम सोले वांग्याची भाजी, गरमागरम पोळी किंवा भाकरी आणि सोबत काकडी कांदा लिंबू, असे सर्व्ह करावे.