Leftover Rice Recipe In Marathi : दररोज ताजे व शिजलेले अन्न खावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. पण, कधी कधी स्वयंपाक बनवताना अंदाज चुकला तर एखादा पदार्थ उरतो. पोळी उरली की त्याचा पराठा, भात उरला तर तो सकाळी फोडणी देऊन खाल्ला जातो. पण, तुम्ही सारखेच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ (Leftover Rice Recipe) घेऊन आलो आहोत. सोशल मीडियावरील एका इन्स्टाग्राम युजरने हा खास पदार्थ व्हिडीओत बनवून दाखवला आहे, ज्याचे नाव आहे रात्री उरलेल्या भाताचे कटलेट. चला तर पाहुयात कसा बनवायचा हा पदार्थ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य :

१. एक वाटी उरलेला भात

२. दोन बटाटे

३. एक चिरलेला कांदा

४. हिरवी मिरची

५. एक चमचा मीठ

६. अर्धा चमचा धने पावडर

७. अर्धा चमचा लाल मिरची पावडर

८. अर्धा चमचा गरम मसाला

९. हिरवी कोथिंबीर

१०. दोन चमचे कॉर्न फ्लोअर

११. एक चमचा मैदा

१२. पाणी

१३. ब्रेड क्रम्स

१४. तेल

हेही वाचा…Apple Recipe : जेवणानंतर काहीतरी गोडं खावंसं वाटतंय? मग सफरचंदापासून बनवा हा पदार्थ; वाचा सोपी-हेल्दी रेसिपी

व्हिडीओ नक्की बघा…

कृती (Leftover Rice Recipe) :

१. एक वाटी उरलेला भात घ्या.

२. दोन उकडवून, किसलेले बटाटे, एक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, एक चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हिरवी कोथिंबीर घाला.

३. सर्व मिश्रण एकत्र करा.

४. मिश्रणाला कटलेटचा आकार द्या.

५. दोन चमचे कॉर्न फ्लोअर, एक चमचा मैदा आणि पाणी घालून एक मिश्रण तयार करा, त्यात हे कटलेट बुडवून घ्या.

६. नंतर ब्रेडचे बारीक बारीक तुकडे (Bread Crumbs) करा. कटलेटवर हे ब्रेड क्रम्स टाका.

७. गॅसवर कढई ठेवा गरम तेलात तळून घ्या.

८. तुमचे स्वादिष्ट कटलेट तयार आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

रात्री उरलेल्या भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे :

आपण भात शिजवून थंड करून ठेवला व तो काही वेळानंतर किंवा दुसऱ्या दिवशी खाल्ला तर यामुळे भातातील स्टार्च व ग्लाइसेमिक इंडेक्स कमी होऊन केवळ साखरेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते किंवा जर तुम्हाला रात्रीचा उरलेल्या भात दुसऱ्या दिवशी खायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी (Leftover Rice Recipe) करून पाहू शकता. सतत फोडणीचा तेलकट भात खाऊन आपल्यातील अनेकांना कंटाळा येतो . त्यामुळे हा पर्याय आपल्या सगळ्यांसाठीच बेस्ट ठरेल असेल म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sometimes leftover rice we all have in our kitchens than make them cutlet read marathi recipe asp