डॉ. सारिका सातव

साहित्य

* ज्वारी- अर्धा वाटी,

* उडीद डाळ- अर्धा वाटी

* तांदूळ- अर्धा वाटी

* मेथी दाणे- पाव चमचा

* मीठ, तेल- चवीप्रमाणे

कृती :

ज्वारी धुऊन ६ ते ७ तास भिजवावी.

तांदूळ व उडीद डाळही धुऊन चार तास वेगवेगळी भिजवावी.

भिजवल्यानंतर डाळ, मेथी दाणे व मीठ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

ज्वारी व तांदूळही वाटून घेऊन सर्व मिश्रण एकत्र करावे आणि सात ते आठ तास ठेवावे.

मिश्रणात पाणी घालून डोसा करण्याजोगे करावे.

तवा तापवून थोडे तेल लावून डोसे करावेत.

चटणीबरोबर खाण्यास द्यावे.

वैशिष्टय़े

*  या पदार्थामधून कॅल्शिअम, कबरेदके, प्रथिने मिळतात.

*   चवीस उत्तम असल्याने आबालवृद्धांना खाण्यास उपयुक्त.

*   लहान मुलांच्या तसेच मोठय़ांच्याही डब्यासाठी उपयुक्त.

Story img Loader