Adai Dosa : डोसा हा जरी साउथ इंडियन पदार्थ असला तरी भारताच्या सर्वच राज्यात आवडीने खाल्ला जातो. सहसा आपण तांदळापासून डोसा घरी बनवतो पण तुम्ही कधी तांदूळ आणि मिक्स डाळीपासून बनवलेला डोसा खाल्ला आहे का? यालाच अडई डोसा सुद्धा म्हणतात. अडई डोसा अत्यंत पौष्टिक आणि चवीला तितकाच टेस्टी असतो. आज आपण अडई डोसा घरच्या घरी कसा बनवायचा, हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.
साहित्य :
तांदूळ
तूर डाळ
चणा डाळ
मुग डाळ
उडीद दाळ
लाल मिरच्या
मेथी दाणे
आले
तेल
हेही वाचा : असा बनवा हॉटेलसारखा खमंग शाही पुलाव, लगेच ही सोपी रेसिपी जाणून घ्या
कृती :
तांदूळ, सर्व डाळी, मेथी दाणे आणि लाल मिरच्या ५-६ तास पाण्यात भिजत ठेवावेत.
त्यातील पाणी काढून त्यात आलं आणि मीठ टाकावे
आणि मिक्सरमध्ये बारीक करावे.
डोसाच्या पिठा इतकं मिश्रण दाट करावं.
एक नॉनस्टीक तवा गरम करावा करावा आणि गरम तव्यावर डोसा टाकावा.
कडेने तेल सोडावे.
डोसा चांगला भाजावा.
हा गरम डोसा तुम्ही सांबर आणि बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता.