Soya Pulao Recipe in Marathi: सोयाबीनची भाजी, सोयाबीन राईस अशा सोयाबीनच्या अनेक रेसिपी आपण घरच्या घरी ट्राय केल्या असतील. पण तुम्ही कधी सोया पुलाव बनवला आहे का? खव्वयांना आवडणाऱ्या सोयाबीनचा हा पुलाव अगदी चविष्ट लागतो. काहीच मिनिटांत बनणाऱ्या या सोया पुलावची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
- 1/2 किलो तांदूळ
- दीडशे ग्रॅम सोयबिन वडी
- 2 कांदे
- 2 टोमॅटो
- 3 चमचे आल लसूण मिरची पेस्ट
- 3 पळी तेल
- 1 चमचा जीरे
- 1 चमचा राई
- 1/2 चमचा हिंग
- 3 चमचे मसाला
- 2 चमचे हळद
- 2 चमचे गरम मसाला
- चवी प्रमाणे मीठ
- भरपूर कोथिंबीर
- आखा खडा मसाला
कृती
प्रथम सोयाबीन गरम पाण्यात पाच ते दहा मिनिटे घालून ठेवणे. तांदूळ स्वच्छ धुऊन पूर्ण पाणी काढून ठेवणे. गॅसवर कुकर ठेवून त्यात थोडे जास्त तेल घालून गरम मसाला, लसूण फोडणीला घालावे.
नंतर त्यात काजू, टोमॅटो,कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट फोडणीला घालून चांगले परतून घ्यावे व नंतर हळद,मसाला, गरम मसाला घालून सर्व एकजीव करावे व सोयाबीन त्यात घालावी.
नंतर त्यात धुतलेले तांदूळ घालून सर्व एकजीव करावे व प्रमाणात पाणी घालून वरून मीठ घालावे.
कुकर बंद करून दोन शिट्या करून घेणे व नंतर दोन मिनिटे बारीक करून गॅस बंद करावा थंड झाल्यावर कुकर उघडून त्यात भरपूर कोथिंबीर घालावी व सर्व एकत्र करून घ्यावे.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.