Soya Sticks : लहान मुलांना चिप्स, कुरकुरे खूप आवडतात. आता सोया स्टिक्स सुद्धा लहान मुलांचे आवडते स्नॅक्स आहे. अनेकदा आपण मुलांसाठी सोया स्टिक विकत आणतो पण नेहमी नेहमी बाहेरचे खाणे चांगले नाही. जर तुमच्या मुलांनाही सोया स्टिक आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला सुद्धा सोया स्टिक आवडतात का? जर हो तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. अनेकदा आपण बाहेरुन विकत आणून सोया स्टिक खातो पण आता असे करायची काहीही आवश्यकता नाही कारण आज आपण सोया स्टिक कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोयाबिनच्या पीठापासून बनवले जाणारे हे सोया स्टिक चवीला अप्रतिम वाटतात. कुरकुरीत असे सोया स्टिक कसे बनवायचे, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यासाठी ही रेसिपी नोट लगेच करा. अगदी झटपट होणारे हे सोया स्टिक एकदा बनवले तर जवळपास दोन तीन महिने टिकतात. त्यामुळे मुलांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

साहित्य

  • सोयाबिनचे पीठ
  • बेसन
  • जिरे
  • हळद
  • बेकींग सोडा
  • मीठ
  • काळी मिरी
  • लाल मिरची पावडर
  • धनेपूड
  • तेल

हेही वाचा : Samosa Puri : पालकांनो, मुलांना कुरकुरे-चिप्स पेक्षा कुरकुरीत मसाला समोसा पुरी खाऊ घाला, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात सोयाबिनचे पीठ घ्या.
  • त्यानंतर त्यात बेसन घाला.
  • त्यानंतर त्यात लाल मिरचीचे पावडर घाला.
  • त्यानंतर त्या काळी मिरी घाला.
  • त्यात हळद घाला आणि त्यानंतर जिरे घाला.
  • त्यानंतर धनेपूड घाला आणि शेवटी चवीनुसार मीठ घाला.
  • त्यानंतर त्या चिमुटभर बेकींग सोडा टाका
  • आणि शेवटी थोडे त्यात तेल घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण एकत्र करा.
  • त्यात थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्या.
  • १५ मिनिटे हे पीठ भिजवून ठेवा.
  • १५ मिनिटानंतर हे पीठ तेलाने पुन्हा एकदा मळून घ्या.
  • गॅसवर एका कढईत तेल गरम करा.
  • त्यानंतर चकली बनवण्याच्या साचामध्ये हे पीठ टाका आणि सोया स्किट बनवा.
  • हे सोया स्टिक कमी आचेवर तेलातून तळून घ्या.
  • तुम्ही हे सोया स्किट दोन महिने टिकवून खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soya sticks recipe how to make soya stick snack recipe news ndj