Soyabean Bhurji Recipe: सोयाबीनची भाजी, सोयाबीन राईस अशा सोयाबीनच्या अनेक रेसिपी आपण घरच्या घरी ट्राय केल्या असतील. पण तुम्ही कधी सोयाबीनची भुर्जी बनवली आहे का? खव्वयांना आवडणाऱ्या सोयाबीनची ही भुर्जी अगदी चविष्ट लागते. काहीच मिनिटांत बनणाऱ्या या सोयाबीन भुर्जीची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

सोयाबीन भुर्जीचे साहित्य

सोया चंक्स

तेल

१ टेबलस्पून जीरं

चिरलेली लसूण

हिरवी मिरची

१ चिरलेले कांदा

१ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची

अर्धा टेबलस्पून धने पावडर

अर्धा टेबलस्पून हळद पावडर

अर्धा टेबलस्पून मीठ

१ चिरलेला टोमॅटो

कोथिंबीर

हेही वाचा… पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’

सोयाबीन भुर्जी रेसिपी

१. सोया चंक्स एका भांड्यात भिजवा, जेणेकरून ते मऊ होतील.

२. त्याला चांगले मिक्स करा.

३. एक कढई घ्या, त्यात तेल गरम करा आणि १ टेबलस्पून जीरं, चिरलेली लसूण, हिरवी मिरची आणि १ चिरलेले कांदा घाला.

४. त्यात १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची, अर्धा टेबलस्पून धने पावडर, अर्धा टेबलस्पून हळद पावडर आणि अर्धा टेबलस्पून मीठ टाका.

५. नंतर त्यात १ चिरलेला टोमॅटो घाला आणि चांगले शिजवा.

६. त्यात भिजवलेले सोया चंक्स आणि १ टेबलस्पून गरम मसाला टाका.

७. कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.

८. तुमची सोया बुरजी तयार आहे.

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.