Soyabeen Recipe In Marathi: तुम्हाला सोयाबीन आवडतात का? तुम्ही ऐरवी सोयाबीनची भाजी आवडीने खात असाल पण आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके रेसीपी घेऊन आलो आहोत. तुम्ही कधी सोयाबीनची बिर्याणी खाल्ली आहे का? नसेल तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा. सोयाबीन आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. सोयाबीनला प्रथिनांचा स्त्रोत मानला जातो त्यामुळे अनेक शाकाहारी लोक सोयबीनचे सेवन करतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी सोयाबीन फायदेशीर ठरतो. हाडांना बळकटी आणि मजबूती देण्यासाठी सोयाबीन मदत करतो. तसेच हृदयासंबंधित आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सोयाबीन मदत करते. वजन, रक्तदाब आणि कोलेस्टॉल नियंत्रणात राखण्यासाठी देखील सोयबीन मदत करते. सोयाबीनच्या नियमित सेवनामुळे निद्रानाश दूर होऊन केसांची वाढ चांगली होऊ शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोयाबीनची बिर्याणीसाठी साहित्य : (Ingredients for Soybeanchi Biryani)

दोन वाट्या सोयाबीन, तीन वाटया तांदूळ, कांदे, फ्लॉवर, घेवडा, गाजर, प्रत्येकी अर्धी वाटी, काजू, खोबरे, काळा मसाला, आले, लसूण, तेल, तूप, गरम मसाला, पनीरचे तुकडे, बटाटा, टोमॅटो.

सोयाबीनची बिर्याणीसाठी कृती : (Recipe for Soybeanchi Biryani

सोयाबीन दोन तीन तास भिजवून कुकरमध्ये उकडून घ्या. तुपावर लवंग, काळे मिरे टाकून, भात मोकळा शिजवून घ्या. भाज्या चाळणीवर वापवून घ्या. कांदा थोडा तळून बाजूला ठेवा. कांदा खोबरे भाजून त्याच आले-लसूण घालून पेस्ट तयार करा.

बटाट्याचे पातळ काप तळून घ्या. कढईत तेल घालून त्यात टोमॅटो, कांदा, गुलाबी होईपर्यंत परता. यात वाटण घाला. काळा मसाला, मीठ, हळद, घाला. पुन्हा चांगले परतून घ्या. नंतर सोयाबीन आणि भाज्या घालून व्यवस्थित परतून एक वाफ आणा.

हे ही वाचा<< नवरत्न पुलाव घरीच बनवून जिभेला द्या कमाल ट्रीट! भात चिकट होऊ नये यासाठी खास हॅकही शिका

जाड बुडाच्या भांड्याला आतून तूप लावा. भाताचे दोन भाग करुन एकाला केशरी रंग लावा. पांढरा भात, भाजी, केसरी भात असे थर लावा. बाजूने बटाट्याचे काप लावा. त्यामध्ये तळलेले काजू टाका. थर हाताने लावा. घट्ट झाकण लावून दोन तीन वाफ आणा.

वाढताना तळलेला कांदा टाकून थरासकट भात उकरा. रंगीत थरांची बिर्याणी छान लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyabean biryani recipe in marathi quick veg dinner dishes with rice maharashtrian recipes lifestyle snk