recipes for summer : उन्हाळा सुरु झाला की तमाम गृहिणींचा मोर्चा वळतो तो पापड, सांडगे, कुरडई यांसारख्या वाळवणाच्या पदार्थांकडे. उन्हाळ्यात वर्षभराचे वाळवण करायची लगभग सुरु होते. अनेक घराघरांमधून मग महिलांच्या छान मैफिली रंगतात. त्यात पापड, कुरडई, साबुदाणा चकली, सांडगे, अशा नानाविध प्रकार बनवले जातात. कुरडई हा प्रकार लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतो. त्यात उन्हाळ्यात तर आपण फेणी, कुरडई आणि पापड यांसारखे अनेक पदार्थ बनवतच असतो. असंच काहीसं हटके आणि खुसखुशीत अशी तांदळाचे कुरडईची रेसिपी आपण आज पाहणार आहोत..

तांदळाचे कुरडई बनवण्यासाठी लागणारं साहित्य

  • २ कप तांदळाचे पीठ
  • २ कप पाणी
  • १ टेबलस्पून मीठ
  • २ टेबलस्पून तेल
  • पापड खार
  • रंग आपल्या आवडीनुसार

तांदळाचे कुरडई कृती –

प्रथम, एका भांड्यात तांदूळ धुवून घ्या, त्यानंतर त्यात पाणी घालून ३ दिवस भिजत ठेवा. दररोज पाणी बदलत राहा. तिसऱ्या दिवशी पाणी काढून थोडे सुकवून बारीक दळून घ्या.आता एक जाड भांडं घ्या. त्यात २ कप पाणी घाला, पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पापड खार, मीठ व तेल घालून मिक्स करा. मग त्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ घालून हलवत रहा. मिश्रण सतत मिक्स करत राहा. मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा, व त्यावर ३ मिनिटे झाकण ठेवा.एका प्लेटमध्ये तयार तांदळाचे उकडीचे पीठ काढून घ्या. चकलीच्या सोरयानीला शेवेची चाक लावून तेलाने ग्रीस करा, व त्यात तयार पीठ घाला. आता झाकण बंद करा. एका प्लास्टिक पेपरला तेलाने ग्रीस करा. व त्यावर कुरडई गोलाकार घाला. सर्व कुरड्या घालून झाल्यानंतर कडकडीत उन्हात वाळवून घ्या. पूर्ण वाळल्यानंतर डब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे तांदळाचे कुरडई तयार

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
strawberry Salsa Recipe try this new strawberry recipe in this winter seasond
हिवाळ्यात स्ट्रॉबेरीची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग झटपट बनवा ‘स्ट्रॉबेरी साल्सा’
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…

हेही वाचा – बिना तेलाचे टेस्टी छोले, खाल्ले आहेत कधी? ही घ्या ऑइल फ्री रेसिपी

आता उन्हाची तीव्रता अधिक वाढू लागली असून उन्हाळी पदार्थ तयार करण्याचे योग्य वातावरण निर्माण झाले आहे.