Ginger and cinnamon kadha recipe: आता हिवाळा सुरु झाला आहे आणि या ऋतूत सर्वाधिक होणारा आजार म्हणजे सर्दी पडसं आणि खोकला होय, खास करून लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर या आजाराला तोंड द्यावं लागतं कारण त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर असते. यामुळे थोडी जर थंडी शरीराला लागली तरी त्यांना सर्दी खोकला होतो. हा आजार जरी सामान्य असला तरी जर हाताबाहेर गेला तर खूप हैराण करतो. कधी कधी आपल्याला सुद्धा सर्दी खोकल्याचा खूप त्रास होतो. यावर उपाय म्हणून आम्ही तुम्हाला एका खास काढ्याबद्दल सांगणार आहोत जो तुम्ही सर्दी खोकला झाल्यावर लहान मुलांना देऊ शकता.
आले आणि दालचिनीचा काढा साहित्य :
दोन कप पाणी
एक इंच किसलेले आले
एक दालचिनीची काडी
काळी मिरी चार ते पाच
एक टीस्पून मध
लिंबाचा रस चवीनुसार
१. आले आणि दालचिनीचा काढा कृती :
सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.
त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.
नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.
यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.
हेही वाचा >> हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.
२. तुळस, काळी मिरी आणि मध काढा
तुळशीची पाने, काळी मिरी आणि मध एकत्र केल्याने एक शक्तिशाली काढा तयार होतो. या तिन्ही घटकांचे अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तुळशीची पानं, काळी मिरी आणि मध घालून मिक्स करा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. आणि चहा गाळून प्या.