Rava Appe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आप्पे खायला आवडतात. आपण नेहमीच तिखट आप्पे, मूगाचे आप्पे, नाचणीचे आप्पे आवडीने खातो. पण आज आम्ही तुम्हाला रव्याचे गोड आप्पे कसे बनवायचे हे सांगणार आहोत.
रव्याचे गोड आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
१. २ वाटी रवा
२. १/२ वाटी ओलं खोबरं
३. १/२ वाटी गुळ
४. १/२ चमचा पिवळा रंग
५. १/२ वाटी काजूचे तुकडे
६. १ वाटी साजूक तूप
७. १/२ चमचा वेलची पूड
८. मीठ चिमूटभर
रव्याचे गोड आप्पे बनवण्याची कृती:
१. सर्वातआधी एका कढईत रवा भाजून घ्या.
२. त्यानंतर पाण्यात गुळ विरघळवून घ्या आणि तो रवा गरम असतानाच त्यात टाका.
३. आता ओलं खोबरं किसून त्यात एकजीव करुन घ्या. त्यानंतर सर्व साहित्य त्यात टाकून एकत्र करून घ्यावे.
४.हे मिश्रण १ तास झाकून ठेवावे.
५. त्यानंतर अप्पे पात्र गरम करून त्यात तूप सोडून मिश्रण भरुन घ्या.
६. मिश्रण भांड्यात भरल्यानंतर झाकण ठेऊन ५ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
७. त्यानंतर झाकण काढून आप्पे चमच्याने अलगद उलटवून घ्या.
हेही वाचा: खास मुलांसाठी पिझ्झा पॅकेटची टेस्टी रेसिपी; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
८. त्यात पुन्हा थोडे तूप सोडून झाकण न ठेवताच ३-४ मिनिटे होऊ द्यावे.
९. त्यानंतर हे आप्पे काढून सर्व्ह करताना त्यावर थोडेसे तूप सोडा.