Sago Barfi Recipe: सध्या नवरात्री सुरू असून या दिवसांमध्ये उपवासाच्या विविध रेसिपी महिला ट्राय करत असतात. तसेच लहान मुलांनाही नवनवीन खाद्यपदार्थ खाण्याची आवड असते. तुम्ही आतापर्यंत साबुदाण्याचा वडा, खीर खाल्ली असेल; पण आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याची बर्फी कशी बनवायचा हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला एकदमी सोपी आहे.
साबुदाण्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी साबुदाणा
- २ वाटी साखर
- १ चमचा वेलची पावडर
- १/२ वाटी ड्राय फ्रुट्स
- १ लिटर दूध
- १ वाटी तूप
साबुदाण्याची बर्फी बनवण्याची कृती:
हेही वाचा: साबुदाणा न भिजवता फक्त काही मिनिटांत झटपट बनवा साबुदाण्याची खिचडी; एकदम सोपी रेसिपी
- साबुदाणे पाण्यात भिजवून घ्या. त्यानंतर साबुदाण्यातील पाणी काढून ते कोरडे करून घ्या.
- आता साबुदाणा एका कढईत भाजून तो कोरडा झाल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा.
- साबुदाणा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून साबुदाण्याची पावडर तयार करा.
- आता एका कढईमध्ये साबुदाण्याचे तयार केलेली पावडर भाजून घ्या यावेळी वरून तूपही घाला.
- दुसरीकडे दूधात साखर, वेलची पूड घालून दूध पूर्णपणे आटवून घ्या.
- आता आटवलेले दूध साबुदाण्याच्या पिठात मिक्स करून घ्या.
- आता ज्यात बर्फी बनवणार आहात त्या ताटात बर्फीचे मिश्रण ओता त्यावर ड्रायफ्रुट्स घाला आणि बर्फी थंड झाल्यावर तिचे काप करा.
- तयार साबुदाण्याच्या बर्फीचा आस्वाद घ्या.