Spicy Kobi Paratha Recioe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पराठा आवडतो. तुम्ही आता पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्ले असेल. तुम्ही कधी कोबी पराठा खाल्ला आहे का? सहसा आपण कोबीची भाजी बनवतो पण नेहमी नेहमी कोबीची भाजी बनवून कंटाळले असाल तर तुम्ही स्वादिष्ट असा कोबीचा पराठा खाऊ शकता. कोबीचा झणझणीत पराठा कसा बनवायचा, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
- कोबी
- कांदा
- कोथिंबीर
- गव्हाचं पीठ
- लसूण
- आलं
- हिरवी मिरचे
- लाल तिखट
- जिरे पूड
- धने पूड
- हळद
- कढीपत्ता
- गरम मसाला
- बटाटा
- तेल
- तूप
- मीठ
हेही वाचा : Corn Upma : ओल्या मक्याचा पौष्टिक उपमा खाल्ला का? लगेच ही सोपी रेसिपी नोट करा
कृती
- सुरुवातीला कोबी मिक्सरमधून बारीक करा
- या बारीक केलेल्या कोबीमध्ये स्वच्छ धुवून कोथिंबीर टाका
- बारीक चिरलेला कांदा त्यात टाका
- त्यात दोन तीन लसणाच्या कळ्या आणि आलं टाका .
- हिरवी मिरचे टाका आणि थोडा कढीपत्ता टाका.
- आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमधून बारीक करा.
- या बारीक केलेल्या मिश्रणात जिरे पूड, धने पूड, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाका
- या मिश्रणात शिजवून घेतलेला बटाटा किसून टाका.
- त्यानंतर त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा टाका.
- हे मिश्रण एकत्र करा.
- गव्हाच्या पीठाची पोळी लाटून घ्या.
- त्यात हे मिश्रण भरा आणि पोळीचा पुन्हा गोळा करा.
- त्यानंतर हलक्या हाताने पराठा लाटून घ्या
- गरम तव्यावर तेल किंवा तूप टाकून पराठा दोन्ही भाजून भाजून घ्या.
- हा पराठा तुम्ही तुमच्या आवडच्या चटणीबरोबर खाऊ शकता.
First published on: 10-11-2023 at 08:32 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spicy kobi paratha recipe how to make cabbage paratha at home paratha lovers food news ndj