Garlic Chutney : चटणीमुळे जेवणाचा स्वाद वाढतो. आपण सहसा शेंगदाण्याची चटणी, टोमॅटोची चटणी, चिंचेची चटणी, नारळाची चटणी, डाळीची चटणी घरी बनवतो पण तुम्ही कधी लसणाची चटणी घरी बनवली आहे का? लसणाची चटणी ही अत्यंत पौष्टिक आणि चवीला स्वादिष्ट असते. लसणाची चटणी सहसा वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खातात. जर तुम्हाला घरच्या घरी लसणाची चटणी बनवायची असेल तर ही सोपी रेसिपी नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य :

  • लसूण
  • मीठ
  • शेंगदाणे
  • आमचूर पावडर
  • लाल तिखट
  • तेल

हेही वाचा : पौष्टिक अडई डोसा खाल्ला का? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा अन् घरीच झटपट बनवा

कृती:

  • लसणाच्या पाकळ्या सोलून घ्याव्यात
  • त्यात थोडे लाल तिखट घालून हे लसूण मिक्सरमधून बारीक करावे
  • फोडणीसाठी लहान कढई घ्यावी आणि त्यात तेल गरम करावे. तेलात बारीक केलेले लसूण चांगले परतून घ्यावे.
  • त्यात पुन्हा लाल तिखट टाकावे
  • याच मिश्रणात शेंगदाण्याचा कूट, आमचूर पावडर आणि मीठ घालावे.
  • ही लसणाची चटणी तुम्ही वडापाव, डोसा किंवा पराठाबरोबर खाऊ शकता.