अद्वय सरदेसाई
मुंबईत जरी नावाला असली तरी बाकीच्या ठिकाणी आता हळूहळू थंडी पडू लागली आहे. त्यामुळे कधीतरी न्याहरीसाठी मसालेदार सुपाचा हा पर्याय चालू शकतो.
आणखी वाचा
साहित्य
कोबी, गाजर, सिमला मिरची, मशरुम, कांदा पात, फ्लॉवर या भाज्या बारीक चिरलेल्या, बारीक चिरलेली लसूण, नूडल्स उकडलेल्या. थोडय़ाशा तळलेल्या नूडल्सही लागतील, रेड चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचप, व्हिनेगार, कॉर्नफ्लोअर, मीठ, साखर, तेल
कृती
एका भांडय़ात तेलावर लसूण परतावा. त्यातच भाज्याही परतून घ्याव्यात. यानंतर पाणी आणि मीठ घालून या भाज्या किंचित उकळून घ्याव्यात. आता कॉर्नफ्लोअर, दोन्ही सॉसेस, पाणी यांचे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण भाज्यांच्या मिश्रणात घालून त्यात मीठ, साखर घालावे. एक उकळी आणावी आणि उकडलेल्या नूडल्स घालाव्या. सूप प्यायला घेताना वरून तळलेल्या नूडल्स घालून घ्याव्यात.