Potato Thecha Recipe: आपल्या भाकरी आणि ठेच्याची सर दुसऱ्या कोणत्याच पदार्थाला येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विविध पद्धतीचा ठेचा बनवला जातो. त्यातीलच मिरचीचा ठेचा अनेकांच्या आवडीचा आहे. पण, आज आम्ही तुम्हाला बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४-५ उकडलेले बटाटे
  • ९-१० हिरव्या मिरच्या
  • ७-८ लसणाच्या पाकळ्या
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

बटाट्याचा ठेचा बनवण्याची कृती:

हेही वाचा: झटपट होणारे तांदळाचे थालीपीठ नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती..

  • सर्वप्रथम बटाट्याची साल काढून घ्या आणि लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या.
  • त्यानंतर बटाटे, मिरच्या, लसूण हे सर्व खलबल्यात ठेचून घ्या.
  • आता गॅसवरच्या मध्यम आचेवर पॅनमध्ये तेल ओतून त्यात जिऱ्याची फोडणी द्या आणि सर्व मिश्रण परतून घ्या.
  • मिश्रण परतल्यावर त्यावर मीठ घाला.
  • आता काही वेळ बटाट्याच्या ठेच्यावर काही वेळ झाकण घालून ठेवून गॅस बंद करा.
  • तयार गरमागरम ठेचा भाकरीबरोबर सर्व्ह करा.