ज्योती चौधरी-मलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य-

२५० ग्रॅम पालक, ५/६ हिरव्या मिरच्या, १० ग्रॅम आलं, १ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, दीड चमचा आमचूर, १ लिंबू, पाव चमचा काळे मीठ, दीड चमचा लोणी, मीठ चवीनुसार.

कृती

पालक स्वच्छ धुऊन शिजवून घ्या, हिरवी मिरची व आलं एकत्र वाटून घ्या. शिजलेला पालक मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका भांडय़ामध्ये लोणी गरम करून त्यात हिंग, जिरे, आले-मिरचीचे वाटण घालून परतून घ्या. यामध्ये तो शिजलेला पालक घाला आणि दोन मिनिटे शिजू द्या. मग नेहमीचे मीठ आणि काळे मीठ घाला. आमचूर घालून ढवळा. भांडे गॅसवरून खाली उतरवा. थंड होऊ द्या. आवडीप्रमाणे लिंबू पिळा. वाटल्यास थोडी साखर घाला. पालक चटणी तयार आहे.