Spinach Omelette : ऑम्लेट हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तुम्ही आजवर आॉम्लेट हे फक्त अंड्यापासून बनवलेले खाल्ले असेल पण तुम्ही कधी पालकचे ऑम्लेट खाल्ले आहे का? पालकचे ऑम्लेट हे पालक आणि अंड्यांपासून बनवले जाते. पालक ही अत्यंत पौष्टिक असते. त्याचबरोबर अंडे सुद्धा शरीराला पोषक आहे. जर तुम्ही अंडी खात असाल तर हिवाळ्यात फ्रेश मिळणाऱ्या पालक पासून तुम्ही ही रेसिपी करून पाहा. या दोन्ही पदार्थाचे खास मिश्रण करुन पालकचे ऑम्लेट करू शकता. पालकचे ऑम्लेट कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या. हे ऑम्लेट तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी नाश्त्याला बनवू शकता. मुलांच्या टिफीनवर द्यायला हा अतिशय झटपट होणारा पदार्थ आहे. एकदा हा पदार्थ खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. या पालक ऑम्लेटची चव अप्रतिम लागते.

साहित्य

पालकची पाने
बारीक चिरलेला कांदा
अंडी
मीठ
मिरेपूड
तूप

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट

हेही वाचा : Puri Bhaji : अशी बनवा हॉटेलसारखी पुरी भाजी; टम्म फुगलेली पुरी अन् चविष्ठ बटाट्याची भाजी , लगेच नोट करा रेसिपी

कृती

सुरुवातीला पालकची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
एका पातेल्यात पाणी घ्यावे त्यात मीठ घालावे आणि चांगले उकळावे
त्या उकळलेल्या पाण्यात पालकची पाने ५ मिनीटे ठेवावी.
त्यानंतर उकळलेली पालकची भाजी पाण्यातून काढावी आणि सुकी करून घ्यावी.
गॅसवर तवा गरम करावा आणि त्यावर मध्यम आचेवर १ चमचा तूप गरम करावे.
त्यावर बारीच चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा.
त्यानंतर तो परतून घेतलेला कांदा पालकच्या पानांमध्ये घालावा.
त्यात मीठ व मिरेपूड घालावे आणि चांगले एकत्र करावे.
एका भांड्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्यावी.
तव्यावर मध्यम आचेवर उर्वरित १ चमचा तूप गरम करावे.
तूप वितळले की ते फेटलेल्या अंड्यात घालून एक मिनीट चांगले फेटून घ्यावे.
नंतर त्यात पालकचे मिश्रण घालून चांगले एकत्रित करावे.
आता हे मिश्रण पुन्हा तव्यावर घालून मंद आचेवर सेट होऊ द्यावे.
पालकचे ऑम्लेट तयार होईल.
गरमागरम हे ऑम्लेट सर्व्ह करावे.

Story img Loader