Spinach Omelette : ऑम्लेट हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तुम्ही आजवर आॉम्लेट हे फक्त अंड्यापासून बनवलेले खाल्ले असेल पण तुम्ही कधी पालकचे ऑम्लेट खाल्ले आहे का? पालकचे ऑम्लेट हे पालक आणि अंड्यांपासून बनवले जाते. पालक ही अत्यंत पौष्टिक असते. त्याचबरोबर अंडे सुद्धा शरीराला पोषक आहे. जर तुम्ही अंडी खात असाल तर हिवाळ्यात फ्रेश मिळणाऱ्या पालक पासून तुम्ही ही रेसिपी करून पाहा. या दोन्ही पदार्थाचे खास मिश्रण करुन पालकचे ऑम्लेट करू शकता. पालकचे ऑम्लेट कसे बनवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी ही सोपी रेसिपी लगेच जाणून घ्या. हे ऑम्लेट तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी नाश्त्याला बनवू शकता. मुलांच्या टिफीनवर द्यायला हा अतिशय झटपट होणारा पदार्थ आहे. एकदा हा पदार्थ खाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. या पालक ऑम्लेटची चव अप्रतिम लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा