हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. हिरव्या पालेभाज्यामध्ये पालक खाण्याचे अनेक फायदे आहे. पालक शरीराला हायड्रेट ठेवते आणि पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते. पालक खाण्याचे अगणित फायदे आहे पण पालकची भाजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही पालकची एक आगळी वेगळी रेसिपी ट्राय करू शकता. पालक टोफू कटलेट्स.
आज आपण पालक टोफू कटलेट्स कसे बनवायचे याविषयी जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : हेल्दी इंद्रधनुष्यी चाट कधी खाल्ली का? मग एकदा ट्राय कराच, जाणून घ्या रेसिपी
साहित्य –
- टोफू १ कप
- पालक ब्लांच करून १ कप पेस्ट
- कोथिंबीर चिरून
- आले मिरची लसूण पेस्ट चवीप्रमाणे
- हिरवे वाटाणे उकडून आणि वाटून १ कप
- मीठ
- आमचूर पावडर
- सोया पीठ किंवा स्पेशल लो कार्ब पावडर
- तेल
हेही वाचा : हेल्दी नाश्ता करायचाय? मग टेस्टी किनवाचा उपमा बनवा, जाणून घ्या रेसिपी
कृती –
- टोफू कुस्करून घ्या.
- त्यात भाज्या टाका.
- सर्व मसाले टाका आणि नीट एकत्र करून घ्या.
- त्यात थोडे थोडे सोया पीठ किंवा स्पेशल लो कार्ब पावडर टाकत जा.
- तयार मिश्रणाला टिक्कीचा आकार द्या आणि तव्यावर टाकून तेल टाकून परता.
- चटणीबरोबर खा.