Breakfast Recipe : नेहमी नेहमी नाश्त्याला काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. दररोज पोहे, उपमा, मसाला डोसा, इडली खाऊन कंटाळला असाल तर आज आपण एक हटके रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही अनेकदा मसाला डोसा घरी बनवला असाल पण कधी स्पंज डोसा घरी बनवला आहे का? काही लोकांना वाटते की स्पंज डोसा घरी नीट बनवता येत नाही, त्यामुळे ते घरी बनविणे टाळतात पण आज आपण अशी सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही कापसाहून मऊसूत जाळीदार स्पंज डोसा बनवू शकता. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना हा डोसा खूप आवडेल. सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. हा स्पंज डोसा कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • तांदूळ
  • पोहे
  • उडदाची डाऴ
  • साबुदाणा
  • मेथी
  • मीठ
  • तूप

हेही वाचा : Poha Vada Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत पोह्यांचे वडे, एकदा खाल तर खातच राहाल

कृती

  • एक कप तांदूळ, अर्धा कप जाड पोहे, पाव कप उडदाची डाळ, पाव कप साबुदाणा आणि अर्धा चमचा मेथी एकत्र एका भांड्यामध्ये घ्या आणि त्यात पाणी टाका.
  • हे मिश्रण तीने ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे मिश्रण पाण्यात पाच तास भिजवून ठेवा.
  • पाच तासानंतर हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करा.
  • स्पंज डोसासाठी मिश्रण बारीक केल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढावे. त्यात चवीनुसार मीठ टाकावे. त्यानंतर दहा ते बारा तास हे मिश्रण झाकूण ठेवावे.
  • बारा तासानंतर हे मिश्रण तुम्हाला घट्ट मऊसूत झालेले दिसेल.
  • गॅसवर तवा ठेवा आणि चांगला गरम होऊ द्या.
  • त्यानंतर गरम तव्यावर तूप टाका.
  • आणि तव्याच्या मध्यभागी हे मिश्रण टाका. डोसा जास्त पसरवू नका. स्पंज डोसाच्या आकारानुसार हा डोसाचा आकार ठेवा.
  • जाळीदार स्पंज डोसा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यावा.
  • कापसाहून मऊसूत असा जाळीदार स्पंज डोसा तयार होईल.
  • हा स्पंज डोसा तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sponge dosa recipe how to make sponge dosa at home breakfast recipe news ndj
Show comments