Spongy Bhaji : भजी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तुम्ही आजवर कांदा भजी, बटाटा भजी, कोबी भजी, इत्यादी भज्यांचे प्रकार खाल्ले असतील पण तुम्ही कधी स्पंजी भजी खाल्ली आहे का? तुम्हाला वाटेल, हा कोणता भजीचा प्रकार आहे. अनेक लोकांना स्पंजी विषयी माहिती नाही. हो स्पंजी भजी. या भजीमध्ये कांदा किंवा बटाटा असे काहीही समाविष्ट केले जात नाही. फक्त बेसनपासून बनवली जाणारी ही भजी मस्त टम्म फुगते. चवीला अप्रतिम आणि अतिशय मऊ असणारी ही भजी कुणालाही आवडेल.

तुम्ही जर ही भजी खाल्ली नसेल तर तुम्ही ही भजी बनवू शकता. ही भजी बनवायला फार वेळ लागत नाही. झटपट काही खायचे असेल आणि कुणाला खाऊ घालायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. लहान मुले अनेकदा भज्यांमधून कांदा, बटाटा बाहेर काढतात. त्यांच्यासाठी तुम्ही कांद्याविना बनवली जाणारी ही भजी बनवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही भजी बनवायची कशी तर ही रेसिपी लगेच नोट करा आणि गरमा गरम स्पंजी भजी बनवा.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर

साहित्य

  • बेसन
  • लाल तिखट
  • हळद
  • जिरे पावडर
  • धनेपूड
  • मीठ
  • बेकिंग सोडा
  • गरम मसाला
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

हेही वाचा : Soya Sticks आवडतात? मग घरच्या घरी असे बनवा कुरकुरीत सोया स्टिक

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात बेसन घ्या.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, जिरे पावडर आणि धनेपूड घाला.
  • गरम मसाला टाका.
  • चवीनुसार मीठ घाला.
  • पीठ चांगले पाण्याने भिजवून घ्या.
  • पिठाच्या गाठी होऊ नये, असे पीठ भिजवावे.
  • पीठ भिजवल्यानंतर दहा मिनिटे झाकून ठेवा.
  • दहा मिनिटानंतर या पिठात बेकिंड सोडा मिक्स करा.
  • शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • गॅसवर एक कढई ठेवा.
  • त्यात तेल गरम करा.
  • तेल गरम झाल्यानंतर त्यात एका छोट्या चमच्याचा मदतीने छोटी छोटी भजी तेलात सोडा.
  • भजी कमी आचेवर तळून घ्या.
  • चवीला अप्रतिम वाटणारी ही गरमा गरम भजी तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.

Story img Loader