Kanda Paat Bhaji : स्वयंपाक बनवताना कांद्याचा आपण नियमित वापर करतो. कांद्याप्रमाणेच कांद्याची पात सुद्धा आरोग्यासाठी चांगली असते. कांद्याच्या पातमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. अनेक लोकांना कांद्याची पात खायला आवडत नाही. लहान मुले सुद्धा अनेकदा कांद्याची पातीची भाजी खाण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी लहान मुले असो किंवा इतर कोणी ज्यांना कांद्याची पातीची भाजी खायला आवडत नाही त्यांना तुम्ही कांद्याच्या पातीची भजी खाऊ घाला.
तुम्हाला वाटेल कांद्याची पातीची भजी कशी होतात तर ही कांद्याच्या पातीची कुरकुरीत भजी खायला खूप चविष्ट आणि अप्रतिम वाटतात. ही भजी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. आता हिवाळ्यात कांद्याची पात मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते अशात गरमा गरम भजी बनवण्याचा बेत तुम्ही आखू शकता. कांदा भजी, बटाटे भजी, कोबी भजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही कांद्याची पातीची भजी बनवू शकता. ही भजी कशी बनवायची, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही रेसिपी जाणून घ्या. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी झटपट ही भजी बनवू शकता.
साहित्य
- कांद्याची पात
- बेसन
- ओवा
- लाल तिखट
- जिरे
- मीठ
- हळद
- तेल
- हिरवी मिरची
- आलं लसूण
- कोथिंबीर
हेही वाचा : Gul Papdi : हिवाळ्यात खा गुळाची पापडी, कशी बनवायची माहिती नाही? मग ही सोपी रेसिपी जाणून घ्या
कृती
सुरुवातीला कांद्याची पात घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या.
ही कांद्याची पात नीट बारीक चिरुन घ्या.
एका भांड्यात चिरलेली कांद्याची पात टाका
त्यानंतर त्यात थोडे बेसन घाला
त्यात जिरे, ओवा आणि लाल तिखट घाला
आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा तयार करा
त्यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाका
सर्व मिश्रण एकत्र करा.
त्यात पाणी घालून मिश्रण भिजवून घ्या.
गॅसवर कढई ठेवा आणि कढईत तेल गरम करुन घ्या.
गरम तेलात भजी तळून घ्या.
कमी आचेवर ही भजी छान तळून घ्यावीत.
तांबुस रंग येईपर्यंत भजी तळून घ्यावीत
ही भजी तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता