Sprouted Matar Cheese Stuff Cutlet Recipe In Marathi: रोज रोज काय बरं नवीन बनवायचं, यावरून सगळ्यांचाच घरी वाद होत असतात. एकाला एक आवडतं तर दुसऱ्याला दुसरं त्यामुळे घरी एकापेक्षा अनेक पदार्थ बनवावे लागतात. सगळ्यांची मर्जी राखता राखता घरातल्या त्या महिलेची दमछाकच होते. म्हणून आज आपण असा पदार्थ जाणून घेणार आहोत, जो सगळेच आवडीने खातील. चला तर मग जाणून घेऊ या, ‘मटार चीज स्टफ कटलेट’ रेसिपी घरच्या घरी कसं बनवाल…

साहित्य

  • 2 वाटी मोड आलेले मटार
  • 1 मोठा बटाटा शिजवून साल काढलेला
  • 1 मोठी वाटी ब्रेडक्रम्ब्स
  • 4 मिरची,दहा लसूण, एक इंच आलं यांचं वाटण
  • 1 कांदा बारीक चिरलेला
  • 1/4 चमचा हळद,अर्धा चमचा तिखट, अर्धा लिंबाचा रस,पाव चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ,थोडीशी साखर
  • 1 टेबलस्पून तेल फ्राय करण्यासाठी
  • 1 वाटी चीज

कृती

मटार मिक्सरमधून वाटून घ्यावे. त्यामध्ये बटाटा कुस्करून घालावा. त्याबरोबरच ब्रेडक्रम्स घालून एकजीव करावे.

त्यामध्ये हळद, तिखट मसाला, कांदा, मीठ, साखर, लिंबाचा रस, आलं, लसूणच वाटण सगळं घालून एकजीव करावं. मग त्याचा गोळा बनवून त्यामध्ये चीज स्टफ करावं व गोळा कटलेट मोल्डमध्ये घालून त्याला शेप द्यावा व गरम तव्यावर ठेवावा.

दोन्ही बाजूने ब्रशने तेल लावावं व मंद गॅसवर दोन्ही बाजूने सोनेरी रंग होऊ द्यावा. असे सर्व कटलेट करावे व मेयोनेज आणि सॉस बरोबर खावे किंवा हिरव्या चटणी बरोबर आपण खाऊ शकता. अतिशय टेस्टी व हेल्दी असे हे मटारचे कटलेट होतात.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader