Starter fish recipes: तुम्हाला मासे खाणं आवडत असेल तर तुम्हाला फिश फ्राय नक्कीच आवडेल. ही फिश फ्रायची रेसिपी इतकी चवदार आहे, की एकदा खाऊन तुमचं मन अजिबातच भरणार नाही. मासे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही असतात. मासे पचण्यासही हलके असतात. आहारतज्ञही मटण-चिकनच्या तुलनेत मासे खाण्यास सांगतात. चला तर मग आज पाहुयात स्टार्टर फिश फ्राय रेसिपी कशी बनवायची…

स्टार्टर फिश फ्राय साहित्य

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

१. १ अख्खी मोठी सुरमई, २५० ग्राम कोळंबी
२. २ टेबलस्पून लिंबूरस व कोकम आगळ
३. १/२ टीस्पून हळद
४. १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
५. ४ टेबलस्पून मालवणी फिश मसाला
६. २ टेबलस्पून तांदळाचं पीठ
७. ४ टेबलस्पून बारीक रवा
८. चवीनुसार मीठ
तेल शालो फ्राय करण्यासाठी

स्टार्टर फिश फ्राय कृती

१. सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन जास्तीचे पाणी काढून घ्यावे. कोळंबी ही साफ करून त्यातील काळा धागा काढून स्वच्छ धुवून घ्या.

२. एका बाऊलमध्ये हळद, मीठ, मालवणी फिश मसाला, आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ आणि लिंबाचा रस घालून सर्व मसाला एकत्र करून घ्यावा. सुरमईच्या तुकड्यांना व कोळंबीला हे मिश्रण लावून अर्धा तास मुरत ठेवावे.

३. ३० ते ४५ मिनिटांनंतर मॅरिनेट केलेले सुरमईचे तुकडे व कोळंबी तांदळाच्या पिठात व रवा एकत्र करून त्यात घोळवा

४. एका पसरट तव्यावर लागेल तसे तेल घालून गरम करावे. आच मंद करून मासे तळून घ्यावेत. एका बाजूने ४-५ मिनिटे तळल्यानंतर मासे पलटून दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवर तळून घ्यावे.

हेही वाचा >> खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अशी “बटर रोस्ट फ्रेंच बीन फिश फ्राय” ही घ्या रेसिपी

५. गरज वाटल्यास थोडे तेल घाला. कोळंबी सुध्दा अशीच भाजून घ्या. दोनही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू पेपरनी टिपून घ्या व गरमागरम स्टार्टरस पाहुण्यांना सर्व्ह करा.

Story img Loader