Strawberry Banana Smoothie Recipe In Marathi: सध्या स्ट्रॉबेरीची सिझन सुरू आहे. या सिझनमध्ये अनेकांना स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह आवरत नाही. पण याच स्ट्रॉबेरीपासून आपण आज एक चवदार स्मूदी बनवणार आहोत. याची खास रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी कशी बनवायची ते पाहू या…

साहित्य

१ केळी

५ स्ट्रॉबेरी

१/२ कप दूध

१/८ टीस्पून चिया सीड

आवडीनुसार साखर घालावी

स्ट्रॉबेरी सिरप पण वापरू शकता

कृती

प्रथम स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून पुसून कापून घ्यावी व केळी पण कापून घ्यावी.

चिया सीड स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवावी.

मग हे सगळे पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

मग त्यात दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.

मग वाटी मध्ये किंवा ग्लास मध्ये चिया सीड घालावे

मग त्यात स्मूधी घालून वरून एक स्ट्रॉबेरी कट करून घालून सर्व्ह करावे

*नोट- ही रेसिपी कूकपॅडवरून घेण्यात आलेली आहे.

Story img Loader