Strawberry Salsa Recipe: आता हिवाळी सुरू झाला आहे. जागोजागी हंगामी फळे पाहायला मिळतील. यात सर्वांचं आवडतं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. जशी आंब्यासाठी लोकं मे महिन्याची वाट पाहतात तसंच स्टॉबेरीसाठी खाद्यप्रेमी हिवाळ्याची वाट पाहतात. नुसती अशीच स्ट्रॉबेरी खायला जितकी मजा येते तितकीच मजा त्याच्यापासून नवनवीन पदार्थ ट्राय करायला येते. या हिवाळ्यात तुम्हालाही स्ट्रॉबेरीची अशी एखादी रेसिपी जाणून घ्यायचीय का जी अगदी झटपट होते आणि चविष्टदेखील लागते. चला तर मग जाणून घेऊ या ‘स्ट्रॉबेरी साल्सा’ची रेसिपी.
हेही वाचा… स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
स्ट्रॉबेरी साल्सा साहित्य
- ८-१० स्ट्रॉबेरी
- १/२ छोटा कांदा
- चिरलेला १ छोटी हिरवी मिरची
- १/२ लिंबाचा रस
- १ टीस्पून चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून ब्राऊन शुगर / कोकोनट शुगर
हेही वाचा… Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
स्ट्रॉबेरी साल्सा कृती
१. प्रथम स्ट्रॉबेरीचे देठ काढा आणि अंदाजे स्ट्रॉबेरी कापून घ्या.
२. चॉपर किंवा मिक्सरच्या भांड्यात सर्व चिरलेले साहित्य, स्ट्रॉबेरी, मीठ आणि कोकोनट शुगर घालून ३-४ सेकंद ठेवा. जेणेकरुन सर्व काही नीट मिक्स होईल. पण जास्त ब्लेंड करू नका.
३. एका बाऊलमध्ये ते मिश्रण घ्या आणि सर्वकाही चांगले मिसळा. चव तपासा आणि आवश्यक असल्यास साखर किंवा मीठ घाला. तुम्ही यात थोडा पुदिना (ऐच्छिक) देखील घालू शकता.
४. आता हा स्ट्रॉबेरी साल्सा नाचोजबरोबर सर्व्ह करा.