नीलेश लिमये – nilesh@chefneel.com
साहित्य –
* अर्धा किलो चिकन खिमा
* ४ मोठय़ा लाल सिमला मिरच्या
* २ चमचे तेल
* १ चमचाभर वाटलेली लसूण
* पाव चमचा चिली फ्लेक्स
* २ चमचे चिरलेला पुदिना
* १ कप किसलेले मोझेरेला चीझ
* १ चमचा गरम मसाला
* मीठ.
कृती
सगळ्यात आधी चिकन खिमा व्यवस्थित धुऊन घ्यावा. हळद, मीठ, वाटलेली लसूण, गरम मसाला याचे मिश्रण चिकनला लावून ते मुरण्यासाठी ठेवावे. दुसरीकडे लाल मिरची घेऊन त्यातला वरील भाग चिरून आतील बिया काढून ती पोकळ करून घ्यावी. मसाल्यात मुरवलेला खिमा या मिरच्यांमध्ये भरावा.
आता कढईत तेल गरम करून त्यावर खिमा भरलेल्या सिमला मिरच्या परताव्यात. थोडे पाणी घालून वाफवून घ्यावे आणि गॅसवरून खाली उतरावे. शेवटी त्यावर किसलेले चीझ, चिली फ्लेक्स आणि पुदिना घालून सव्र्ह करावे.