जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने करा गिलक्याची पातळ भाजी”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा गिलक्याची पातळ भाजी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरली गिलक्याची भाजी साहित्य

  • १/२ किलो गिलके किंवा घोसाळे
  • १ वाटी दाण्याचा कूट
  • मीठ
  • थोडासा गुळ
  • २ चमचे तिखट अर्धा चमचा हळद
  • तुमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग
  • १ मोठा चमचा तेल
  • १० लसणाच्या पाकळ्या
  • थोडीशी कोठांबिर
  • १ चमचा धनेजिरे पावडर

भरली गिलक्याची भाजी कृती

स्टेप १

प्रथम घोसाडी धुऊन ती पुसावी व त्याला मोठ्या मोठ्या फोडी करून मध्ये खाच पाडावी

स्टेप २

लसूण, तिखट, मीठ, हळद लावून बारीक करून घ्यावं व ते शेंगदाण्याच्या कुटात मिक्स करावं. त्यामध्ये गुळ घालावा धने जिऱ्याची पावडर घालावी तीही मिक्स करावं आणि हे सर्व मिश्रण गिलक्यांमध्ये भरावे.

हेही वाचा >> झणझणीत खायची इच्छा आहे? ट्राय करा खानदेशी मिरच्यांची भाजी; नोट करा सोपी रेसिपी

स्टेप ३

मध्ये तेल घालून ते गरम झाले की जिरं मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करून त्यात ही भरलेले गिलके घालून छान हलक्या हाताने परतावे. अगदी पाव वाटी पाणी घालून झाकण ठेवून ते शिजवावे. त्यावर कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा व गरम गरम चपाती बरोबर खायला द्यावे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stuffed gilki recipe in marathi khandeshi style gilkyachi bhaji recipe srk