आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतो. त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची, भेंडी, दोडका, पालक बनवतो. पण त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो पण ह्याच भाज्यांमध्ये आपण मसाले भरले तर किती चटपटीत भाज्या बनतील. अशीच एक चटपटीत भाजी आज आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे शिमला मिरचीची. शिमला मिरची सारख्या कंटाळवाण्या भाजीमध्ये आपण जर मसाले भरले तर ती भाजी सुद्धा चटपटीत बनेल. तर आपण आज पाहणार आहोत चटपटीत अशी भरलेली शिमला मिरचीची भाजी. या भाजीमध्ये आपण आपल्या घरामध्येच असलेले मसाले वापरणार आहोत आणि खूप कमी वेळात ही चटपटीत भाजी तयार होते. चला तर मग पाहुयात सोपी रेसिपी

भरलेली ढोबळी मिरची साहित्य

Jugad for home safety tips to protect house from thieves and fraud video goes viral
VIDEO: घरात चोरी होऊ नये म्हणून तरुणानं शोधला भन्नाट जुगाड; एकही रुपया खर्च न करता आधी हे काम करा, घरात कधीच चोरी होणार नाही
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Madhugandha Kulkarni passed Hemant dhome movie fussclass dabhade
“आपल्या मातीतल्या गोष्टी….”, मधुगंधा कुलकर्णीने ‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटाचं केलं कौतुक; म्हणाली, “‘ॲनिमल’, ‘पुष्पा’ असे…”
Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
Sun ukhana sasu sun ukhana Funny video viral on social media
“दातात दात बत्तीस दात…”, सुनेचा सासूसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Pune Accident
Pune Accident : सासवड रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत मोटार चालकाचा मृत्यू
  • शिमला मिरची – पाव किलो
  • तेल – १ वाटी
  • जिरं – १/२ चमचा
  • हिंग – १/४ चमचा
  • आलं लसूण पेस्ट – २ चमचे
  • कांदा – १ मोठा
  • टोमॅटो – १
  • हळद – १/२ चमचा
  • मिरची पावडर – १ १/२ चमचा
  • गरम मसाला पावडर – १ चमचा
  • धने पूड – १ चमचा
  • बेसन – १/२ वाटी
  • उकडलेले बटाटे – २
  • मीठ – चवीपुरते
  • आमचूर पावडर – १/२ चमचा
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – १/२ वाटी

भरलेली ढोबळी मिरची कृती

१. प्रथम शिमला मिरची धुवून घ्या. नंतर मिरचीचे दोन भाग करा देठ तशीच ठेवायची आणि बी काढून टाका.

२. आता आपण सारण करून घेऊ. सारणासाठी प्रथम एक कढई घ्या आणि त्यात ४ चमचे तेल घाला. तेल चांगल तापलं की त्यात १/२ चमचा जिरे, १/४ चमचा हिंग घाला.

३. नंतर गॅस कमी करून त्यात आलं लसणाची पेस्ट घाला. छान परतून घ्या नंतर त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून घाला. व छान हलका तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या.

४. नंतर त्यात १ टोमॅटो बारीक चिरून टाका. त्यातील बी काढून टाका व छान परतून घ्या. आता त्यात १/२ चमचा हळद घाला. १ १/२ चमचा लाल मिरची पावडर घाला.

५. नंतर त्यात १ चमचा गरम मसाला पावडर, १ चमचा धने पूड व १/२ वाटी बेसन घाला व छान एकत्र करून घ्या.

६. आता २ ते ३ मिनिटे हे सर्व मसाले छान परतून घ्या. नंतर त्यात उकडून आणि किसून घेतलेले २ बटाटे घाला.

७. नंतर त्यात चवीपुरते मीठ, १/२ चमचा आमचूर पावडर व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व गॅस कमीच ठेवून २ मिनिटे परतून घ्या व सर्व साहित्य एकजीव करा. आता आपलं सारण तयार झालं.

हेही वाचा >> झटपट करा चमचमीत टोमॅटो शेव भाजी; चवीला बेस्ट- करायला सोपे, नोट करा सोपी रेसिपी

८. आता सारण थंड झाल्यावर आपण चिरलेल्या शिमला मिरची मध्ये भरून घ्या.

९. आता एक पसरट पॅन किंवा तवा घ्या. त्यात २ मोठे चमचे तेल घाला. तेल चांगले तापले की त्यात आपण भरलेले शिमला मिरची घाला व छान दोन मिनिटे होऊ द्या.

१०. नंतर मिरची दुसऱ्या बाजूने उलटी करून त्यावर झाकण ठेवा. व दोन मिनिटे छान होऊ द्या.

११. ही शिमला मिरची ७ ते ८ मिनिटे अशीच उलट पलट करून शिजवून घ्यायची. म्हणजे दर दोन मिनिटाला उलटत राहायची. व झाकण ठेवून शिजू द्यायची.

हेही वाचा >>

१२. तर तयार आहे आपली खमंग आणि कुरकुरीत शिमला मिरची. तर तुम्ही सुद्धा ही भरवा मिरची बनवून बघा व कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा.

Story img Loader