महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. पुणे म्हटलं की येथील बाकरवडी किंवा मिसळपाव विशेष प्रसिद्ध आहे. पण तुम्ही पुण्याची मस्तानी कधी खाल्ली का? पुण्याची मस्तानी ही जगप्रसिद्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्ही मस्तानीप्रेमी असाल पण डॉक्टरांनी कमी गोड खायला सांगितले असेल तर तुम्ही शुगरफ्री मस्तानीही खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला शुगरफ्री मस्तानी कशी बनवायची, याविषयी सांगणार आहोत. जाणून घेऊ या रेसिपी.

हेही वाचा : Paplet fry: केळीच्या पानातील पापलेट फ्राय; एकदा नक्की ट्राय करा

साहित्य –

  • १ ग्लास तसंच अर्धी वाटी म्हशीचे दूध
  • २ खजूर, ८-१० बदाम
  • २ थेंब बटरस्कॉच इसेन्स
  • १ स्कूप शुगरफ्री बटरस्कॉच वा व्हॅनिला आइस्क्रीम
  • सजावटीसाठी बदाम
  • पिस्त्याचे काप

हेही वाचा : सँडविच बनवताना ब्रेड ओला होऊ नये म्हणून लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या Sandwich फ्रेश ठेवण्याचे ५ उपाय

कृती –

  • अर्धी वाटी दुधात बदाम आणि खजूर भिजत घाला.
  • व्यवस्थित भिजल्यावर साले काढून मिक्सरमध्ये गंधासारखे बारीक वाटून घ्या.
  • १ ग्लासभर दूध गरम करून त्यात खजूर-बदामाचे मिश्रण घालून ५ मिनिटे उकळून घ्या.
  • थंड करायला ठेवा.
  • मिश्रण सामान्य तापमानाला आल्यावर त्यात बटरस्कॉच इसेन्स घालून नीट मिसळून घ्या.
  • मिश्रण थंड झाले की फ्रिजमध्ये २/३ तास ठेवून पुरेसे गार करून घ्या.
  • देताना १ स्कूप शुगरफ्री आइस्क्रीम घालून वर बदाम/पिस्त्याचे काप पसरवा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarfree mastani recipe puneri mastani food news ndj