बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळतात. हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले, तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात. बोंबीलमध्ये आयर्नचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. याच्या सेवनामुळे मेंदू तल्लख होतो. कंप्यूटर आणि मोबाईलसमोर तासंतास काम केल्यानंतर डोळे खूपच थकतात. अशावेळी बोंबीलचे सेवन केल्यास डोळ्यांना आलेला थकवा नाहीसा होतो. केसांसाठी देखील बोंबील खूप उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यांसाठी देखील बोंबील खूप फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुके बोंबील घालून फोडणीचा भात कसा करायचा.
सुके बोंबील घालून फोडणीचा भात
साहित्य
- ५ ते सहा सुके बोंबील
- १ कांदा
- ४ लसणाच्या पाकळ्या
- १ हिरवी मिरची
- १/४ चमचा हळद
- १ चमचा मसाला
- थोडी कोथिंबीर
- १ पळी तेल
सुके बोंबील घालून फोडणीचा भात
कृती
१. पाच-सहा सुके बोंबील साफ करून घ्यावेत. त्यानंतर थंड भात चांगला सुटसुटीत करून घ्यावा. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालावे तेल गरम झाल्यावर बोंबील फ्राय करावे.
२. तळलेले बोंबील बाजूला काढून घ्यावे व त्याच तेलात मिरची, लसूण, कांदा फोडणीला घालावा. कांदा थोडा शिजल्यावर मीठ, हळद मसाला घालावा.
३. फोडणी सर्व एकजीव करून थंड भात व तळलेले बोंबील घालून सर्व एकत्र करावे व बारीक गॅस करून चांगली वाफ येऊ द्यावी.
हेही वाचा >> ग्रिल्ड कोरिएन्डर गार्लिक फिश; असा बनवा कुरकुरीत मसाला फिश फ्राय
४. शेवटी वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करण्यास तयार.
रेसिपी कुकपॅडवरुन साभार.