बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात. बोंबील मध्ये आयरन चे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. यामुळे शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे याच्या सेवनामुळे मेंदू देखील तल्लख होत असतो. कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. अशावेळी बोंबील चे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा नश्ट होत असतो. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुका बोंबील रस्सा रेसिपी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुका बोंबील रस्सा भाजी साहित्य

  • १५-२० सुके बोंबील
  • २ शेगवाच्या शेंगा
  • २ कांदे
  • २ टोमॅटो
  • २ इंच आलं
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • ६-७ आमसुलं
  • १ दांडी कडीपत्ता
  • २ वांगी
  • १ बटाटा
  • आवश्यकतेनुसार तेल
  • चवीनुसार मीठ
  • १ टीस्पून हळद
  • १ टेबलस्पून वाडवळी मसाला

सुका बोंबील रस्सा भाजी कृती

  • प्रथम बोंबलाचे साधारण दोन इंचाचे तुकडे करून, धुवुन पाण्यात भिजत घाला. मी इथे निरल वापरली आहेत, त्यामुळे १५ ते २० घेतले. तुम्ही मोठे बोंबील वापरणार असाल तर कॉन्टिटी थोडी कमी करा.
  • आले, लसूण, कढीपत्ता, आमसूल आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या. कांदा बारीक चिरा, कोकमा ऐवजी चिंचेचा कोळ ही वापरू शकता..
  • कुकरमध्ये तेल गरम करून त्यात भिजवलेले बोंबील दोन मिनिटे परतून घ्या. मग त्यात कांदा घालून कांदा थोडासा परतल्यावर त्यात मीठ, हळद आणि वाडवळी मसाला घाला.
  • वाडवळी मसाला नसेल तर घरगुती वापरातील मिक्स मसाला वापरा. पण वाडवळी किंवा आगरी मसाला वगैरे असेल तर भाजी जास्त चविष्ट बनते.
  • मसाले थोडे परतल्यावर त्यात वाटण घाला. टोमॅटो व्यवस्थित परतून झाला की त्यात वांग, शेवग्याची शेंग आणि बटाटा घाला.
  • सर्व व्यवस्थित मिसळून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि दोन शिट्ट्या घ्या.

हेही वाचा >> घरच्या घरी झटपट बनवा पनीर रसमलाई; ‘ही’ सिक्रेट रेसिपी लगेच नोट करा

  • आपली वांग बटाटा शेवग्याची शेंग घालून सुक्या बोंबलाची भाजी तयार.
  • ह्या भाजी जोडीला गरम गरम भात किंवा तांदळाची ओतोलीच कॉम्बिनेशन मिळाला की दोन काय चार घास जास्त जातील.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukha bombil rassa bhaji recipe in marathi bombil rassa recipe in marathi srk