बोंबील बाजारांमध्ये अगदी सहजपणे मिळत असतात. बोंबील हे खाऱ्या पाण्यातले व गोड्या पाण्यातले असे दोन प्रकारचे असतात. बाहेरून दिसायला हे अतिशय विचित्र दिसत असले तरी खाण्यामध्ये याचा अंदाज काही निराळाच असतो खाण्यासाठी हे खूपच स्वादिष्ट लागत असतात. बोंबील मध्ये आयरन चे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मिळत असते. यामुळे शरीरामध्ये असलेल्या मांसपेशींना पूर्णपणे रक्तप्रवाह होत असतो. त्यामुळे याच्या सेवनामुळे मेंदू देखील तल्लख होत असतो. कंप्यूटर मोबाईल समोर तासन्तास काम केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर डोळे खूपच थकून जात असतात. अशावेळी बोंबील चे सेवन केल्यास डोळ्याचा आलेला थकवा नश्ट होत असतो. केसांसाठी देखील बोंबील खूपच उपयुक्त मानले जातात. केस गळतीची समस्या असेल तर अशा समस्यासाठी देखील बोंबील खूपच फायदेशीर ठरतात. चला तर मग पाहुयात सुक्या बोंबलाचा ठेचा कसा करायचा.

सुक्या बोंबलाचा ठेचा साहित्य –

  • चार भाजलेले सुके बोंबील, कोथिंबीर
  • ५ ते ६ मिरच्या, मीठ
  • लसूण पाकळ्या, दोन मध्यम आकाराचे कांदे,
  • लिंबाचा रस चार चमचे

सुक्या बोंबलाचा ठेचा कृती –

सर्वात आधी बोंबील गॅसवर किंवा चुलीवर अगदी खरपूस आणि सर्व बाजूंनी खरपूस भाजून घ्या. थंड झाल्यावर मधोमध चिरुन काटा काढून टाका. भाजलेल्या सुक्या बोंबलाचे तुकडे करून खलबत्त्यात घ्या. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, चिरलेला कांदा, लसूण चवीनुसार मीठ घालून खलबत्त्यात ठेचून घ्या, वरंवटा नसेल तर हलेच मिक्सरमध्ये फिरवा. नंतर थोड्या तेलावर तो ठेचा परतून घ्या, लिंबू पिळा व कोथिंबीर घालून गरम भाकरीबरोबर वाढा. अफलातून चवीचा हा सुक्या बोंबलाचा ठेचा तांदळाची भाकरी, वाफाळता भात आणी रस्सा भाजी बरोबर अप्रतिम लागतो.

हेही वाचा – Clams Curry: नॉनव्हेजचे शौकीन आहात? मग चटकदार शिंपले फ्राय नक्की ट्राय करा

सुक्या बोंबलाचा ठेचा चवीला अतिशय चटकदार स्वादिष्ट लागतो. तुम्हीही सुक्या बोंबलाचा ठेचा नक्की ट्राय करा, आणि कसा होतो हे आम्हाला कळवा.

Story img Loader