Jaljeera Recipe: उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांमुळे होणारी उकाडा आता असह्य होत आहे. कडक ऊन आणि वाढत्या उकाड्याने हैरान लोक असे पेय शोधत आहेत जे शरीराला थंडावा देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशीच एक रेसिपी सांगणार आहोत. हे पेय उन्हाळ्यात आवडीने प्यायले जाते ज्याला जलजीरा म्हणून ओळखले जाते. जलजीरा प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच पण त्यासोबतच पोटाला देखील आराम मिळतो. चला जाणून घेऊ या सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलजीरा करण्याची रेसिपी

जलजीरा करण्यासाठी साहित्य

  • पुदीना -१/२ कप
  • हिरवा कोथिंबिर – १/४ कप
  • बर्फ ४-५ खडे
  • बुंदी – १ टेबलस्पून
  • आले – १ टेबलस्पून
  • चिंच पेस्ट – १ टेबलस्पून
  • जीरा पावडर – १ टेबलस्पून
  • मीठ – १ टेबलस्पून
  • काळी मिरी पावडर – १/४ टेबलस्पून
  • धने – १/२ टेबलस्पून
  • बडीशेप – १/२ टेबलस्पून
  • आमचूर पावडर – १ टेबलस्पून
  • १ हिंग -१ चिमुट
  • साखर – १टेबलस्पून
  • लिंबाचा रस -१ टेबलस्पून

हेही वाचा : Peanut Paneer: दुधाऐवजी शेंगदाण्यापासून बनवा पनीर! जाणून घ्या रेसिपी

जलजीरा तयार करण्याची रेसिपी

  • जलजीरा तयार करण्यासाठी सर्वात आधी पुदीना, हिरवी कोथिंबिर आणि आले मिक्सरमध्ये एकत्र वाटून पेस्ट बनवाय,
  • आता या पेस्टला एका मोठ्या भांड्यात टाका ज्यामध्ये जलजीरा तयार करायाचा आहे.
  • आता यामध्ये चिंचेची पेस्ट, मिठ, काळी मिरी, हिंग, बडीशेप, जीरा पावडर, आमचूर पावडर, लिंबाचा रस आणि साखर टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर यामध्ये २ कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करा.

    हेही वाचा – इम्युनिटी बुस्टर आहे लिंबाच्या सालीची चटणी, जाणून घ्या रेसिपी

    एक ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून त्यामध्ये जलजीरा पाणी टाकून त्यावर वरुन बुंदी आणि पुदीना टाकून सजवू शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer drinks recipe how to make jaljeera at home snk
Show comments