Summer special recipe : उन्हाळा आला कि त्याबरोबर येतात चिंचा, बोरं आणि कैऱ्या. या पदार्थांचे नुसते नाव घेतले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. आता बाजारामध्ये कैऱ्या आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात तोंडात टाकण्यासाठी या चटपटीत आणि आंबट-गोड अशा या गोळ्या नक्की बनवून पाहू शकता. काय आहे याची रेसिपी पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कैरीच्या गोळ्या [Raw mango candy]

साहित्य

कैरी ६-७
तूप – २ चमचे
हिंग – १ चमचा
गुळ – ३०० ग्रॅम
काळे मीठ – २ छोटे चमचे
जिरे पावडर – २ छोटे चमचे
मिरपूड – २ छोटे चमचे
आमचूर पावडर – १ चमचा
गरम मसाला – १ छोटा चमचा
बारीक साखर

हेही वाचा : Kitchen tips : चांगली वांगी कशी विकत घ्यावी? बाजारात जाण्याआधी ‘ही’ ट्रिक पाहा! शेफने दिलाय सल्ला…

कृती

  • सर्वप्रथम सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून आणि सोलाण्याने सोलून घ्या.
  • सोललेल्या कैऱ्यांच्या बारीक फोडी चिरून घ्या.
  • या फोडी एका मिक्सरला लावून कैऱ्या बारीक वाटून घ्या.
  • तयार झालेली ही कैरीची पेस्ट एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
  • आता एका पॅनमध्ये २ चमचे तूप मध्यम आचेवर तापवून घ्या.
  • तूप तापल्यानंतर, त्यामध्ये १ चमचा हिंग घाला आणि नंतर तयार केलेली कैरीची पेस्ट घालावी.
  • कैरीची पेस्ट साधारण २ ते ३ मिनिटांसाठी ढवळून घ्या.
  • आता यामध्ये ३०० ग्रॅम गूळ घालून, तो विरघळेपर्यंत मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
  • कैरीच्या मिश्रणात गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये २ चमचे काळे मीठ, जिरे पूड, मिरपूड, आमचूर पावडर आणि १ चमचा गरम मसाला घालून घ्या.
  • पुन्हा सगळे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळून, शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर पॅनखालील गॅस बंद करावा.
  • कैरीच्या गोळ्यांसाठी तयार झालेले मिश्रण एका पसरट भांड्यात किंवा बाऊलमध्ये काढून, ते गार होण्यासाठी ठेवून द्या.
  • आता हाताला थोडे पाणी लावून, गार झालेल्या कैरीच्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करा आणि बारीक साखरेमध्ये घोळवून घ्या.
  • तयार आहेत आपल्या कैरीच्या आंबट-गोड आणि चटपटीत अशा गोळ्या.
  • तयार झालेल्या या गोळ्या काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा.

हेही वाचा : Recipe : तांदळापासून बनवू पौष्टिक अन् कुरकुरीत नाश्ता; पाहा, मुलंही खातील आवडीने…

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या कैरीच्या गोळ्यांची रेसिपी इन्स्टाग्रामवरील @natashaagandhi या अकाउंटने शेअर केली आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer recipe make this super easy raw mango candy how to make this sweet and sour kairi goli for kids check out dha