उन्हाळ्यात जेवण झाल्यानंतर पोटाला थंडावा आणि आराम देण्यासाठी अनेकांना मस्त गार ताक पिण्याची सवय असते. काही साधे ताक पितात, तर काहींना मसाला ताक अधिक पसंत असते. मात्र तुम्ही कधी ‘चौरंगी’ ताक बनवून प्यायले आहे का? युट्युबवरील vmiskhadyayatra103 नावाच्या अकाउंटने ताकाला भन्नाट असे चार फ्लेव्हर देऊन चौरंगी ताकाची रेसिपी शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये चार रंगांचे आणि स्वादाचे ताक दाखवले आहे म्हणून त्याला चौरंगी ताक नाव दिले आहे. नेमके हे चार फ्लेव्हर कोणकोणते आहेत ते पाहा.
चौरंगी ताक रेसिपी :
सर्वप्रथम चार फ्लेव्हर ताक बनवण्यासाठी सुरवातीला साधे ताक बनवून घेऊ.
त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दही, चवीपुरते काळे मीठ, जिरे पूड, हिंग आणि बर्फ घालून मिक्सरच्या मदतीने दाट ताक बनवून घ्यावे. आता हे ताक पुढे दाखवलेल्या चार फ्लेव्हरसाठी वापरावे.
१. कोथिंबीर-पुदिना ‘ग्रीन’ ताक
साहित्य
आले
कोथिंबीर
पुदिना
हिरवी मिरची
कृती
सर्वप्रथम कोथिंबीर, पुदिना यांची पातळ पेस्ट बनवून घ्या.
आता १ किंवा २ वाटी तयार केलेले साधे ताक मिक्सरच्या भांड्यात मिसळून घ्यावे.
त्यामध्ये थोडे किसलेले आले, तयार केलेली चमचाभर कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट आणि ठेचलेली हिरवी मिरची [स्वादापुरती] घालून घ्या.
सर्व गोष्टी मिक्सरला फिरवून एकत्र करून घ्या.
तयार आहे आपले कोथिंबीर-पुदिना फ्लेव्हर ताक
२. नारळाचे पांढरे शुभ्र ‘व्हाईट’ ताक
साहित्य
ताक
नारळाचे दूध
पाणी
कृती
सर्वप्रथम तयार केलेलं १ किंवा २ वाटी ताक मिक्सरमध्ये घालून घ्यावे.
त्यामध्ये एक वाटी नारळाचे दूध आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
सर्व गोष्टी मिक्सरला फिरवून एकत्र करून घ्या.
तयार आहे आपले ‘व्हाईट’ ताक
हेही वाचा : Recipe : ‘अशी’ खास मटार उसळ एकदा बनवून पाहाच! पाच मिनिटांत होईल सगळ्याचा चट्टामट्टा…
३. बिटाचे ‘पिंक’ ताक
साहित्य
ताक
बीटाचा रस १ चमचा
आले
पाणी
कृती
सर्वप्रथम तयार केलेलं १ किंवा २ वाटी ताक मिक्सरमध्ये घालून घ्यावे.
त्यामध्ये एक चमचा उकडलेल्या बीटाचा रस घालून घ्या.
स्वादासाठी यामध्ये थोडेसे किसलेले आलं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्या.
सर्व गोष्टी मिक्सरला फिरवून एकत्र करून घ्या.
तयार आहे आपले ‘पिंक’ ताक.
४. फोडणीचे ‘गोल्डन’ ताक
साहित्य
ताक
तूप
जिरे
हिंग
हळद
कढीपत्ता
लाल मिरची
पाणी
कृती
सर्वप्रथम तुपामध्ये, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, लाल मिरची यांची फोडणी करून घ्या.
आता तयार केलेलं १ किंवा २ वाटी ताक मिक्सरमध्ये घालून घ्यावे.
त्यामध्ये केलेली तूप-जिऱ्याची फोडणी आणि थोडेसे किसलेले आले घालून घ्या.
यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून, सर्व गोष्टी मिक्सरला व्यवस्थित फिरवून एकत्र करून घ्या.
तयार आहे आपले ‘गोल्डन’ ताक.
युट्युबवरील @vmiskhadyayatra103 या चॅनलने शेअर केलेल्या या ‘चौरंगी’ ताकाची रेसिपी आवडल्यास यंदाच्या उन्हाळ्यात बनवून पाहू शकता.