Coconut Lassi Recipe: उन्हाळा सुरू होताच शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी प्यायला बऱ्याच लोकांना आवडते. पंजाबी लोकांबद्दल बोलायचे झाले तर उन्हाळ्यात त्यांचा नाश्ता एक ग्लास लस्सीशिवाय पूर्ण होत नाही. तुम्ही आजवर दही आणि फळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या लस्सी प्यायल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला अशा लस्सीबद्दल सांगणार आहोत जी फक्त टेस्टसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.या रेसिपीचे नाव आहे कोकोनट लस्सी.नारळाची लस्सी नारळाच्या दुधात किंवा नारळाचे तुकडे करून दही मिसळून लस्सी बनवली जाते, परिणामी एक मलईदार आणि ताजेतवाने पेय मिळते. हे पेय प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि निरोगी वाटेल.
कोकोनट लस्सी साहित्य
१. ३०० ग्रॅम दही
२. २ चमचे फ्रेश क्रीम
३. चिमूटभर काळी मिरी पावडर
४. १/२ चमचा बुकनु पावडर
५. ३ (४ चमचे) साखर
६. १ चौथा चमचा पांढरेमीठ (पर्यायी)
७. १ तृतीयांश कप ताजे नारळ
८. २ चमचे ताजे किसलेले नारळ
९. १ कप दूध
१०. काही बर्फाचे तुकडे
कोकोनट लस्सी कृती
१. प्रथम मिश्रणाचे भांडे घ्या आणि त्यात प्रथम दही आणि साखर घाला.
२. नतरं दोन चमचे फ्रेश क्रीम, चिमूटभर काळी मिरी पावडर, अर्धा चमचा बुकनु पावडर, तीन चार चमचे साखर, एक चौथा चमचा पांढरे मीठ (पर्यायी), एक तृतीयांश कप ताजे नारळ, अणि एक कप दूध घाला
३. मिक्सरच्या भांड्यात एक मिनिट मिसळा.
४. आता सर्व्हिंग ग्लासेसमध्ये लस्सी फिरवून घ्या आणि त्यात थोडे चिरलेले खोबरे आणि बर्फाचे तुकडे घाला.
हेही वाचा >> खवय्यांनो, हॉटेलसारखी बनवा एकदम चमचमीत अशी “बटर रोस्ट फ्रेंच बीन फिश फ्राय” ही घ्या रेसिपी
५. तुमची कोकोनट लस्सी तयार आहे. हे तुम्ही एखाद्या ग्लास मध्ये किंवा त्या नारळात देखील टाका आणि थंड थंड सर्व्ह करा