Gavhachya Kurdaya Recipe In Marathi: कडक उन्हामुळे उन्हाळ्यात गृहिणी पापड, लोणची, कुरडया असे पदार्थ बनवत असतात. एकदा तयार केलेले हे पदार्थ बराच काळ टिकून राहतात. उन्हाळ्यात सुट्टी असल्याने घरातील अन्य सदस्यही त्यांना या कामामध्ये मदत करत असतात. या काळात इमारती, घरांच्या गच्चीवर पापड, कुरडई उन्हामध्ये ठेवल्याचे पाहायला मिळते. आपल्याकडे प्रामुख्याने तांदळाच्या कुरडया बनवल्या जातात. तांदळा व्यतिरिक्त गव्हापासूनही हा पदार्थ तयार करता येतो. आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या कुरडया कशा बनवायच्या याची माहिती देणार आहोत.

साहित्य:

  • १ किलो गहू
  • पाणी
  • तेल
  • चवीनुसार मीठ

कृती:

  • गहू धुवून ३ दिवस भिजत घाला. या तीन दिवसांमध्ये रोज त्यातील पाणी बदला.
  • पाण्यात ठेवल्याने गहू तिसऱ्या दिवसापर्यंत मऊ होतील. (ते मऊ झाले आहे की नाही हे बोटांनी तपासून घ्या.)
  • मऊ झालेले गहू पुन्हा धुवून स्वच्छ करा. पुढे १/२ कप ब्लेंडरच्या भांड्यात घ्या आणि त्यात १ कप पाणी घाला.
  • ब्लेंडरचा वापर करुन ते मिसळा. ते मिश्रण एका पातेल्यामध्ये काढा. त्या पुन्हा एकदा पाणी टाका.
  • मिश्रण व्यवस्थितपणे मिसळून त्यातून निघणारा अनावश्यक भाग काढून टाका.
  • एका भांड्यावर सूती कापड लावून ते मिश्रण गाळून घ्या. त्यात परत पाणी मिसळून ते पुन्हा गाळून घ्या.
  • २-३ वेळी ही कृती केल्यावर उरलेले मिश्रण रात्रभर भांड्यामध्ये झाकून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी मिश्रण पुन्हा एकदा गाळून घ्या. उरलेल्या भागात क्वचित गरम पाणी टाका.
  • त्यानंतर ते पॅनमध्ये थोडसं तेल टाकून मध्यम आचेवर राहू द्या. पाणी, मीठ घालून उकळवा.
  • पाणी उकळल्यावर त्यात गव्हाचे मिश्रण टाका. सतत ढवळत रहा. व्यवस्थितपणे घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • ५ मिनिटांसाठी झाकण लावून ते मिश्रण शिजू द्या. त्यानंतर साच्याला तेल लावून त्यात मिश्रण टाका.
  • पुढे कुरडया तयार करुन १-२ दिवस कडक उन्हात ठेवा. मग त्या हवाबंद डब्यात ठेवून द्या.
  • जेव्हा कधी कुरडया खायची इच्छा होईल, तेव्हा डब्यातून काढून तेलामध्ये तळा.

आणखी वाचा – आधी कधीही खाल्ली नसेल अशी गोड, पौष्टिक ‘निनाव’ बर्फी; जाणून घ्या या खास पदार्थाची सोपी रेसिपी

farmers anger continues in 70 constituencies over soybean msp
७० मतदारसंघांत सोयाबीन ‘रोष’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
How To Make Dahi Kabab In Marathi
Dahi Kabab Recipe : फक्त १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा ‘दही कबाब’; कुरकुरीत, रेस्टोरंटसारखे कबाब पाहून तोंडाला सुटेल पाणी
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
Foodgrain production during Kharif season Crop wise production forecast of Central Government Mumbai
यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार; जाणून घ्या, केंद्र सरकारचा पीकनिहाय उत्पादनाचा अंदाज

(ही रेसिपी MadhurasRecipe Marathi या यूट्यूब चॅनलवरुन घेतली आहे.)