Summer Special Sabudana batata papad : उन्हाळा सुरु झाला आहे. बाहेर कडकडीत ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरोघरी वाळवण करण्यास सुरुवात झाली आहे. गृहिणींचा वाळवणासाठी तयारी सुरु झाली आहे. घराघरात पापड, कुरड्या, बटाट्याचे वेफर्स, किस, तांदळाचे पापड बनवले जातात. यासाठी पुरेसं ऊन आवश्यक असतात. त्यामुळे या दिवसातच वाळवण तयार केली जातात. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील. पण, घरी बनवलेल्या पापडांना वेगळीच चव असते.विशेषत: घरी बनवलेले साबुदाण्याचे पापड खूप चविष्ट असतात. या पापडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बनवायला सोपे आहेत आणि ते बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आवश्यक असते. चला तर मग याची सोपी मराठी रेसिपी पाहुयात…
साबुदाणा पापडसाठी लागणारे साहित्य
- २ कप साबुदाणा
- १० कप पाणी
- २ चमचे जिरे
- १ टीस्पून लाल मिरची
- चवीनुसार मीठ
साबुदाणा पापडसाठी जाणून घ्या कृती
१. साबुदाणा पापड बनवण्यासाठी लहान दाण्याचा साबुदाणा घ्यावा. हे चांगले धुऊन २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवावे.
२. असे केल्यानंतर जाड तळाच्या भांड्यात १० कप पाणी टाकून साबुदाणा उकळावा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात मीठ, जिरे आणि लाल मिरची टाका.
३. विशेष काळजी घ्या की साबुदाणा सतत ढवळत राहा. असे केल्याने साबुदाणा भांड्याला चिकटणार नाही. साबुदाणा घट्ट आणि पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
४. द्रावण तयार झाल्यावर स्वच्छ पॉलिथिन उन्हात पसरवा. आता या पॉलिथिनवर साबुदाण्याचे गरम द्रावण टाका. गोल पापड बनवून पॉलिथिनमध्ये टाका.
५. लक्षात ठेवा की एक पापड दुसऱ्यापासून काही अंतरावर असावा. जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि सहजपणे वाळले जाऊ शकतात.
६. ४ तासांनी पापड उलटे करा. जेणेकरून ते पॉलिथिनला पूर्णपणे चिकटणार नाही आणि उलटल्यावर तुटणार नाही. पापड दोन्ही बाजूंनी सुकल्यावर २ ते ३ दिवस रोज उन्हात ठेवा.
हेही वाचा >> आजीच्या पद्धतीनं घरच्या घरी “आंबोशी” या पद्धतीने बनवा; वर्षभर टिकणारी चटकदार रेसिपी एकदा पाहाच
यानंतर तुम्हाला पापड एका कंटेनरमध्ये ठेवावा लागेल ज्यामध्ये हवेचा संपर्क नसेल. हे पापड तळून तुम्ही हवे तेव्हा खाऊ शकता.