Raw Banana Chakali : सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात शिवची आराधना केली जाते. अनेक शिवभक्त उपवास करतात. अशात दररोज उपवासाला काय खायचं, हा प्रश्न पडतो. साबूदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही कधी केळीची चकली खाल्ली आहे का? केळी आणि साबूदाणापासून बनवली जाणारी ही केळीची चकली खूप टेस्टी असते. कच्च्या केळीची चकली कशी बनवायची, जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • साबूदाणा
  • केळी
  • साबुदाणा
  • जिरे
  • हिरव्या मिरच्याची पेस्ट
  • मीठ

हेही वाचा : चमचमीत डाळ वांगे कधी खाल्ले का? एकदा खाल तर खातच राहाल, नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

  • कच्ची केळी शिजवा
  • त्यानंतर केळीची साले काढा.
  • केळी मिक्सरमध्ये बारीक करा.
  • त्यात एक वाटी साबुदाणा भिजवा.
  • त्यात जिरं, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ टाका
  • सर्व मिश्रण एकत्र करा
  • कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.
  • वाळल्यानंतर या चकल्या तुम्ही तेलातून तळून खाऊ शकता.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun dried raw banana chakali recipe in marathi for shravan month fast ndj
Show comments