रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे. चला तर मग आज पाहुयात अंडा मसाला रेसिपी
अंडा मसाला साहित्य
- ४ अंडी
- २ कांदे
- ३-४ टेबलस्पून कोकणी मसाला
- १ टेबलस्पून हळद
- २ टेबलस्पून धने+जीरे पूड
- १/२ गरम मसाला
- ४-५ टेबलस्पून ओले वाटण-कांदा+खोबरे+आले+लसूण पेस्ट
- खडा मसाला-तमाल पत्र, दालचिनी मिरं.
- ५ टेबलस्पून तेल
- चवीनुसार मीठ
अंडा मसाला कृती
स्टेप १
प्रथम सर्व तयारी करून घेतली.कांदा, खोबरे वाटण भाजून तयार केले.
स्टेप २
अंडी उकडून घ्या.आता कढईत तेल गरम करून त्यात खडा मसाला तेजपाल घालून कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यावा, त्यात ओले वाटण घालून खमंग भाजून घ्या.आता हळद, मसाला,पूड घालून एकजीव करावे.
स्टेप ३
आता कढईत उकळलेले पाणी घालून,मीठ घालावे.छान रस्सा मंद गॅसवर शिजवावे.
हेही वाचा >> रविवार स्पेशल: झणझणीत अंडा मसाला; झटपट होणारी सोपी मराठी रेसिपी
स्टेप ४
तयार भाकरी बरोबर सर्व्ह करावे. बरोबर कोशिंबीर असेल तर, मज्जाच मज्जा…