Egg Keema Masala Recipe In Marathi: रविवार आणि नॉन व्हेज हे समीकरण आपल्याला अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. बऱ्याच जणांकडे रविवारी सकाळी नॉन व्हेज घ्यायला जाणे हा घरातील एका व्यक्तीचे ठरलेले काम असते. ती व्यक्ती न कंटाळता नॉन व्हेजच्या प्रेमापायी ते काम पूर्ण करत असते. रविवारी सगळे घरी असतात. अशा वेळी जेवणाच्या निमित्ताने एकत्र बसणं, बोलणं, गप्पा मारणं होत असतं. सन्डे हा सर्वांसाठी रिलॅक्स होण्यासाठीचा दिवस असतो. हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी लोक नॉन-व्हेजवर ताव मारत असतात. जर एकाच वेळी दोन नॉन व्हेज पदार्थ खायला मिळाले, तर नॉन व्हेज प्रेमींचा आनंद पोटात मावत नाही. असे करण्यासाठी खिमा भरलेली अंडी हा पदार्थ बनवू शकता. शरीरासाठी पौष्टिक आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या पदार्थाची सोपी रेसिपी आम्ही खास लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य:

  • पाव किलो मटण खिमा
  • ५ ते ६ अंडी
  • १ कांदा बारीक चिरून
  • अर्धी वाटी हिरवे वाटण (लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर)
  • अर्धा चमचा हळद
  • १ चमचा भंडारी मसाला
  • १ चमचा धणे-जिरे पूड
  • १ चमचा गरम मसाला
  • तेल २ चमचे
  • चवीनुसार मीठ
  • कोथिंबीर

कृती :

  • अंडी उकडवून घ्या.
  • कुकरमध्ये तेल घालून त्यावर कांदा, हिरवे वाटण घालून परता.
  • त्यावर सगळे मसाले, हळद, मीठ घाला.
  • थोडे पाणी घालून खिमा कोरडा शिजवून घ्या.
  • अंड्याला वरून चार चिरे देऊन त्यात हा खिमा भरा.
  • थोड्या तेलावर ५ मिनिटे शॅलो फ्राय करा. वरून कोथिंबीर पेरा.

Kolambi Koliwada: पौष्टिक कोळंबीपासून बनवा कुरकुरीत, मसालेदार कोळंबी कोळीवाडा; सोपी रेसिपी लगेच करा नोट

खिमा भरलेली अंडी या पदार्थाला काहीजण मसाला अंडी असेही म्हणतात. हा पदार्थ प्रामुख्याने भाकरी, चपातीसह खाल्ला जातो. काही ठिकाणी मसाला अंडी/ खिमा भरलेली अंडी भाताबरोबर चवीने खाल्ली जातात.